Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ईडी’चा मोर्चा आता बोगस टोल वसूलीकडे; महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेशसह 7 राज्यांत छापेमारी

डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे हस्तगत करणे, या फसवणुकीतून फायदा झालेल्यांना ओळखणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणे, हे या छाप्यांचे उद्दिष्ट आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2026 | 11:22 AM
बोगस टोल वसुली प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

बोगस टोल वसुली प्रकरणी ईडीची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गैरव्यवहार झाल्यास ईडीकडून सातत्याने कारवाई केली जाते. त्यातच आता बोगस टोल वसुली आणि सरकारी खात्यांमधून निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने एक मोठी मोहीम सुरू केली. ईडीच्या लखनौ विभागीय कार्यालयाच्या एका पथकाने पीएमएलए (PMLA) अंतर्गत 14 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली.

ईडीची ही मोहीम उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेश, एनसीआर आणि कोलकाता येथे राबवली जात आहे. तपासात असे उघड झाले आहे की, विविध एनएचएआय (NHAI) टोल प्लाझावर अनधिकृत सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता. या सॉफ्टवेअरचा वापर खऱ्या टोल पावत्यांऐवजी बोगस किंवा अनधिकृत पावत्या तयार करण्यासाठी केला जात होता आणि टोलच्या रकमेचा काही भाग सरकारी खात्यांमध्ये नोंद होण्यापूर्वीच वळवला जात होता.

ईडीच्या माहितीनुसार, फॉरेन्सिक तपास आणि एनएचएआयच्या नोंदींनी अशा सॉफ्टवेअरच्या वापराचा दुजोरा दिला आहे. याच्या आधारे, पुढील तपासासाठी ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे हस्तगत करणे, या फसवणुकीतून फायदा झालेल्यांना ओळखणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणे, हे या छाप्यांचे उद्दिष्ट आहे.

टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश

यापूर्वीही थेट कोर्टाने कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन कमी दरात केल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा धक्का दिला. महामार्गासाठी संपादित जमिनीच्या दराचे सुधारित आदेश दिल्यानंतरही मोबदला दिला नाही. त्यावरून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचा ऐतिहासिक आदेश दिला.

टोल प्लाझा जप्तीची पहिलीच वेळ?

शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल होण्यासाठी न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा टोल प्लाझा जप्त होण्याची ही देशातील पहिलीच वेळ असू शकते, असे पक्षकाराचे वकील अॅड. उदय देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर मोठी नामुष्की ओढवली.

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Web Title: Raids conducted in 7 states including maharashtra jammu and madhya pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • national news
  • Toll Plaza

संबंधित बातम्या

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला
1

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला

Telangana Accident News:  मन सुन्न करणारा क्षण! मृत भावाच्या हातावर बहिणीने बांधली शेवटची राखी
2

Telangana Accident News: मन सुन्न करणारा क्षण! मृत भावाच्या हातावर बहिणीने बांधली शेवटची राखी

Sugar Market : साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
3

Sugar Market : साखरेच्या काळाबाजाराला आता बसणार आळा; सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.