देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर...
मुंबई : जून महिन्यात तुरळक पाऊस झाल्याचे पाहिला मिळाले होते. अल-निनोचा प्रभाव यंदाच्या मान्सूनवर जबरदस्त झाला असून, १ जून ते ३० ऑगस्ट या ९० दिवसांच्या मान्सून हंगामात राज्यात सरासरी ११ टक्के तूट नोंदली गेली. त्यानंतर जुलैमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरला. गेल्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत यंदाचा ऑगस्ट तुलनेने कोरडा ठरला आहे. पुणे जिल्ह्यातही ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला.
राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यात कमी पाऊस पडला. त्यापैकी १८ जिल्हे अवर्षणग्रस्त (रेड झोनमध्ये) नोंदले गेले असून, १४ जिल्ह्यांत सरासरीच्या जेमतेम मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव जून आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून आला. तर जुलैमध्ये मात्र बहुतांश भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला. आता सप्टेंबरमध्येही पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीला सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैमध्ये या अंदाजाला छेद देत पुणे शहर आणि परिसरात दमदार पाऊस झाला.
दरम्यान, पुणे आणि घाट परिसरातही ऑगस्टमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. शहरात सप्टेंबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर राहिल्याने काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला. ऑगस्टमध्ये मात्र पावसाने मोठी विश्रांती घेतली. महिनाभर ढगाळ वातावरण राहिले; मात्र प्रत्यक्षात पावसाच्या फारशा सरी पडल्या नाहीत.
किमान तापमानही सामान्यपेक्षा राहणार कमी
सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानही बहुतांश भागांत सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसातील खंड आणि वाढत्या तापमानामुळे काही भागांत उष्णतेचा ताण जाणवण्याची शक्यता आहे. सध्या विषुववृत्तीय प्रशांत महासागरात तीव्र ‘एल निनो’ स्थिती आहे. ही स्थिती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






