Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

२ नोव्हेंबर २०२६ च्या ताज्या १२ तासांतील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये नागपुरातील भीषण आग, मुंबईतील अन्नविषबाधा, पंतप्रधान मोदींच्या हस्ते रिन्यूएबल एनर्जी समिटचे उद्घाटन, तसेच अमेरिका-युक्रेनदरम्यानचा मोठा क्षेपणास्त्र करार यांसारख्या महाराष्ट्र, देश व आंतरराष्ट्रीय बातम्यांचा समावेश आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 02, 2026 | 11:40 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 02.11.2026

Maharashtra Breaking News Today 02.11.2026

Follow Us
Follow Us:
  • 02 Nov 2026 11:40 AM (IST)

    02 Nov 2026 11:40 AM (IST)

    कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

    सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि हत्येची भीषण घटना समोर आली आहे. कपड्याच्या दुकानात झालेला वाद आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोघा नराधमांनी धारदार शस्त्रांनी वार करून ३१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केला आहे. रविवारी (ता. १) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास कामेरी नाका परिसरात हा थरारक प्रकार घडला असून, या घटनेमुळे ईश्वरपूरसह आंबेडकरनगर परिसरात एकच तणाव व खळबळ उडाली आहे.

  • 02 Nov 2026 11:35 AM (IST)

    02 Nov 2026 11:35 AM (IST)

    बँक ऑफ बड़ौदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती जाहीर, लगेच करा अप्लाय!

    सरकारी बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ बड़ौदाने (Bank of Baroda) नवीन भरती जाहीर केली आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. मात्र, ही भरती सामान्य लिपिक किंवा प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांसाठी नसून, बँकेच्या आयटी (IT) विभागातील वरिष्ठ पदे भरण्यासाठी आहे.

  • 02 Nov 2026 11:25 AM (IST)

    02 Nov 2026 11:25 AM (IST)

    बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट

    बारामती शहरासह जिरायती पट्ट्यात आणि इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. बारामती शहरात सकाळी सात पर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही सकाळी सव्वादहापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने एकूण पावसाची नोंद १७० मिलिमीटरच्या पुढे गेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

     

  • 02 Nov 2026 11:15 AM (IST)

    02 Nov 2026 11:15 AM (IST)

    : सौदी-इराण वादाची किनार; इराण जलक्षेत्रातून जाणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांमध्ये भूसुरुंगाला धडकून भीषण स्फोट

    मध्य पूर्वेतील (Middle East) देशांमध्ये सुरू असलेल्या तीव्र तणावाचा थेट परिणाम आता जागतिक व्यापारी जहाजांवर आणि सागरी वाहतुकीवर होऊ लागला आहे. विशेषतः सामरिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मध्ये टँकर्सना लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नेव्हीने दावा केला आहे की, एका सुपरटँकरसह दोन मोठे तेल टँकर प्रतिबंधित व अनधिकृत मार्गातून जात असताना नौदल सुरुंगांवर (Naval Mines) आदळले, ज्यामुळे त्यात शक्तिशाली स्फोट झाले.

  • 02 Nov 2026 11:12 AM (IST)

    02 Nov 2026 11:12 AM (IST)

    जर्नलिस्ट्सविरोधातील गुन्ह्यांसाठी निर्बंध समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन; जाणून घ्या २ नोव्हेंबरचा इतिहास

    जर्नलिस्ट्सविरोधातील गुन्ह्यांसाठी निर्बंध समाप्त करण्याच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त, प्रत्येक वर्षी 2 नोव्हेंबरला जगभरात जागरूकता वाढवली जाते. पत्रकारिता हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे, परंतु अनेक देशांमध्ये पत्रकारांना हिंसक हल्ले, धमक्या आणि हत्या यांचा सामना करावा लागतो. या समस्येचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येणे आवश्यक आहे.

  • 02 Nov 2026 10:55 AM (IST)

    02 Nov 2026 10:55 AM (IST)

    मंगळावरून पृथ्वीवर आला रहस्यमयी पाहुणा; सहारा वाळवंटात सापडला 4.1 अब्ज वर्षे जुना उल्कापिंड

    विज्ञान जगतातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सहारा वाळवंटातील माली देशात संशोधकांना तब्बल ४.१ अब्ज वर्षे जुना मंगळाचा एक उल्कापिंड सापडला आहे. पृथ्वीवर आतापर्यंत सापडलेल्या मंगळाच्या (Mars) तुकड्यांमध्ये हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या उल्कापिंडाच्या कसून अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना मंगळाच्या पृष्ठभागाखाली अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात असल्याचा भक्कम पुरावा हाती लागला आहे. या नव्या संशोधनामुळे मंगळावर कधीतरी जीवसृष्टी किंवा अनुकूल परिस्थिती होती का, याविषयीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

  • 02 Nov 2026 10:45 AM (IST)

    02 Nov 2026 10:45 AM (IST)

    शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन

    बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान आज, २ नोव्हेंबर रोजी आपला ६१ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. दरवर्षी देशभरातून चाहते मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड परिसरातील त्याच्या ‘मन्नत’ या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदाही शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त ‘मन्नत’बाहेर जय्यत तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या एका मोठ्या स्क्रीनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • 02 Nov 2026 10:35 AM (IST)

    02 Nov 2026 10:35 AM (IST)

    एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर निश्चिंत राहा! हा आहे BSNLचा धमाकेदार प्लॅन, 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार हे फायदे

    तुम्हाला देखील वारंवार रिचार्ज करायला कंटाळा येतो का? दर महिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवणं फार कंटाळवाणं काम आहे. खरं तर प्रत्येक स्मार्टफोन यूजरला या समस्येचा सामना करावा लागतो. पण आता तुम्ही वर्षभराची व्हॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लॅन खरेदी करून तुमची हि समस्या सोडवू शकता. असाच एक प्लॅन सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) देखील त्यांच्या यूजर्ससाठी घेऊन आली आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण वर्षभराची म्हणजेच 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. ज्यामुळे यूजर्सना दरमहिना रिचार्जची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नसते.

  • 02 Nov 2026 10:25 AM (IST)

    02 Nov 2026 10:25 AM (IST)

    ‘मेडे, मेडे’चा तो शेवटचा कॉल; ट्रम्प यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर विमान कोसळून 9 ठार

    अमेरिकेच्या राजकारणात (US News) आणि सुरक्षेत सध्या एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील प्रसिद्ध ‘मार-ए-लागो’ (Mar-a-Lago) निवासस्थानाजवळ तातडीने हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली. ही सुरक्षा यंत्रणा बसवल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत, या ठिकाणापासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर एक व्यावसायिक जेट विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व ९ प्रवाशांचा व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या दुहेरी घटनांमुळे संपूर्ण अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

  • 02 Nov 2026 10:15 AM (IST)

    02 Nov 2026 10:15 AM (IST)

    Donald Trump Tariff : भारतासह चीनवर टॅरिफ लावण्याच्या विचारात असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे पाऊल 

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून काही देशांवर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहेत. भारतासह चीनवरही अमेरिकेकडून टॅरिफ आकारला जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने काँग्रेसची मंजुरी न घेता व्यापारासह विविध मुद्द्यांवर कार्यकारी आदेश काढण्याची रणनीती आखली आहे. या घडामोडींमुळे भारतासह इतर देशांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.

  • 02 Nov 2026 10:05 AM (IST)

    02 Nov 2026 10:05 AM (IST)

    Mahalakshmi Express Crime : महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा 

    मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर रविवारी मध्यरात्री दरोड्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवासी गाढ झोपेत असताना चोरट्यांनी डाव साधत ऐवज लंपास केला. सातारा जिल्हा हद्दीत घडलेल्या या दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • 02 Nov 2026 09:55 AM (IST)

    02 Nov 2026 09:55 AM (IST)

    New Zealand Cricket : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का 

    न्यूझीलंडचा संघ ४ नोव्हेंबरपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वीच न्यूझीलंडला मोठा फटका बसला आहे. संघातील दोन महत्त्वाचे खेळाडू—स्टार अष्टपैलू रचिन रवींद्र आणि मधल्या फळीतील फलंदाज मार्क चॅपमन—दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झाले आहेत. विशेष म्हणजे, दुखापतीमुळे हे दोन्ही खेळाडू भारताविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिकाही खेळू शकले नव्हते.

  • 02 Nov 2026 09:45 AM (IST)

    02 Nov 2026 09:45 AM (IST)

     Gokul Milk अध्यक्ष निवडीत आणखी एका  'लेटर बॉम्ब'मुळे राजकीय वर्तुळात खळबळ

    कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकून बहुमत मिळवले, तर महायुतीच्या आघाडीला १२ जागा मिळाल्या.

    अध्यक्ष निवडीसाठी नियमानुसार १४ संचालकांच्या उपस्थितीचा कोरम आवश्यक असल्याने, महायुतीच्या १२ संचालकांनी सभेला अनुपस्थित राहून रणनीती आखली. यामुळे ही निवड लांबणीवर पडली आहे. याच वातावरणात समोर आलेल्या नवीन 'लेटर बॉम्ब'मुळे आणि घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

  • 02 Nov 2026 09:35 AM (IST)

    02 Nov 2026 09:35 AM (IST)

    Mumbai Crime: ऑनलाईन होम क्लिनिंगच्या बहाण्याने मुंबईतील घरात चोरी 

    दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी ऑनलाईन होम क्लिनिंग सर्व्हिस बुक करणे मुंबईतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घरात स्वच्छता करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काम पूर्ण करून कर्मचारी निघून गेल्यानंतर घरातील दागिने गायब असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती; मात्र मालाड पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत या चोरीचा छडा लावून तीन कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Maharashtra to World Breaking News : 

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर आली असून रेल्वेमंत्र्यांनी कामाचा आढावा घेत पाहणी केली.  केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमाशुल्क सवलत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवल्यामुळे बाजारात परदेशी कापसाची आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे खुल्या बाजारात कापसाचे दर घसरले असून (यवतमाळच्या आर्णी बाजारात भाव ९,१०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत), शेतकरी चिंतेत आहेत.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सहलीवर गेलेले मतदार थेट मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यात काही भागांत हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असून, पुण्यात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण व पावसाच्या सरींवर लक्ष ठेवले जात आहे.बँकेच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर अँड एम्प्लॉइजच्या वतीने २ आणि ३ नोव्हेंबर रोजी देशव्यापी दोन दिवसांच्या लाक्षणिक उपोषण/आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.ज्येष्ठ विधिज्ञांद्वारे न्यायालयात तोंडी उल्लेख (Oral Mentioning) करण्यासंदर्भातील सुप्रिम कोर्टाचे नवीन परिपत्रक आजपासून लागू झाले आहे, ज्यामध्ये तरुण व कनिष्ठ वकिलांना प्राधान्य देण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra india breaking news updates 2 november 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत
1

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती
2

Ravindra Jadeja: रविंद्र जडेजाचे एकदिवसीय करिअर धोक्यात? जुन्या सहकाऱ्याच्या आशाही संपुष्टात, अक्षर पहिली पसंती

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
3

Judo Championship: समृद्धी पार्टेची ज्युदो स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी! किसन वीर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी
4

Table Tennis कोर्टवर महाराष्ट्राच्या लेकीचा डंका! मायरा शेखला दुहेरी विजेतेपदाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.