देशभरात सगळीकडे आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी केली जात आहे. मात्र अयोध्येमध्ये एक वेगळेच दृश्य सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. संपूर्ण अयोध्या नगरी राम नामाच्या जयघोषाने सजून गेली आहे. अयोध्येत ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रामलला अयोध्येत विराजमान झाले आहेत. राम मंदिर तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरी केली जात आहे. त्यामुळे सगळीकडे लोकांचा एक वेगSuळाच उत्साह आहे. अयोध्येमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच प्रभू रामाच्या सूर्य टिळकांची भारतातील अनेक लोक उत्साहाने वाट पाहत आहेत. मात्र यामागे कोणते तंत्रज्ञान आहे चला तर जाणून घेऊया.
जाणून घ्या काय आहे तंत्रज्ञान
रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील राम मंदिरात सूर्याची किरण पडणार आहेत. ही सूर्यकिरण दुपारी रामल्लाच्या डोक्यावर पडणार आहेत. आरसे आणि लेन्सने जोडलेल्या विस्तृत यंत्रणेद्वारे त्यांचे ‘सूर्य टिळक’ शक्य होणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद रुरकीचे शास्त्रज्ञ डॉ एसके पाणिग्रही यांनी सांगितल्यानुसार, सूर्य टिळक प्रकल्पाचा मूळ उद्देश रामनवमीच्या दिवशी श्री रामाच्या मूर्तीच्या डोक्यावर टिळक लावणे असा आहे. यामध्ये राम नवमीच्या दिवशी प्रभू रामाच्या मस्तकावर सूर्यप्रकाश आणला जाईल. सूर्य टिळक प्रकल्पामध्ये दरवर्षी चैत्र महिन्यात श्री रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून सूर्यप्रकाशासह प्रभू रामाच्या कपाळावर टिळक केले जाईल आणि दरवर्षी सूर्याची आकाशातील स्थिती बदलते.
#WATCH | ‘Surya Tilak’ illuminates Ram Lalla’s forehead at the Ram Janmabhoomi Temple in Ayodhya, on the occasion of Ram Navami. (Source: DD) pic.twitter.com/rg8b9bpiqh — ANI (@ANI) April 17, 2024
सूर्य टिळक कसे होईल?
सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी येथील टीमने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगलोर यांच्याशी सल्लामसलत करून मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून गर्भगृहापर्यंत सूर्यकिरणे विकसित करण्याची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. गर्भगृहात सूर्यप्रकाश आणण्यासाठी तपशीलवार संपूर्ण रचना CBRI द्वारे विकसित केली आहे. तसेच IIA ने ऑप्टिकल डिझाइन बनवण्यात आली आहे. सूर्य टिळकांसाठी राममंदिरामध्ये ऑप्टो-मेकॅनिकल प्रणाली लागू करण्याआधी रुरकी क्षेत्रासाठी योग्य असलेले छोटे मॉडेल यशस्वीरित्या प्रमाणित करण्यात आले आहेत.
दरवर्षी राम नवमीच्या दिवशी सूर्य टिळक करण्यासाठी सूर्यकिरण उत्तर दिशेकडे पाठवण्यासाठी आरशामध्ये प्रथम समायोजित करण्यासाठी झुकण्याची यंत्रणा वापरण्यात आली आहे. पाणिग्रही यांच्या सांगण्यानुसार, सर्व पाईपिंग आणि इतर भाग पितळ सामग्री वापरून तयार केले जातात. वापरलेले आरसे आणि लेन्स अतिशय उच्च दर्जाचे आहेत आणि ते टिकून राहतील. असे पाणिग्रही म्हणाले.