Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू काश्मिरात आभाळ फाटले; तिघांचा मृत्यू, 100 जणांना वाचवले

जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 21, 2025 | 12:43 PM
Ramban J&K 3 lost their lives 40 houses destroyed in floods 100 rescued

Ramban J&K 3 lost their lives 40 houses destroyed in floods 100 rescued

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर १०० हून अधिक नागरिकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या घटनेत ४० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अनेक घरांमध्ये माती, दगड आणि पाण्याचा ढिगारा शिरला आहे.

या भयावह घटनेनंतर डोंगराळ भागातून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली काही घरे व लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत, मात्र प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आहे.

कुंड गाव सर्वाधिक बाधित, वाहतूक ठप्प

या आपत्तीमुळे रामबनमधील कुंड गाव सर्वाधिक प्रभावित झाला असून, त्या भागातील बहुतांश कुटुंबांचे घर, शेतीसह संपूर्ण संसार उध्वस्त झाला आहे. नाशरी ते बनिहालदरम्यानचा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. किश्तवार-पद्दर मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना हवामान साफ होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : राजगड शिवापट्टणवाडा स्थळांच्या उत्खननात सापडले वाड्याचे अवशेष; शिवकालीन शहराचे दर्शन

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा प्रशासनाशी सतत संपर्क

उधमपूरचे भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी बसीर-उल-हक यांच्याशी सतत संपर्कात असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, “रामबन परिसरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, भूस्खलनाने नुकसान अधिकच गंभीर झाले आहे.” डॉ. सिंह पुढे म्हणाले की, “आपत्तीग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जात आहे. अन्न, औषधे, निवारा आणि तात्पुरती वीज व पाणीपुरवठा याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर असून, बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.”

प्रशासनाची तत्काळ मदत आणि नागरिकांना अपील

डॉ. जितेंद्र सिंह यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “आपत्तीच्या वेळी घाबरून जाऊ नये. प्रशासन आपल्या सोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल.” स्थानिक पातळीवर पोलिस, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहभागी झाले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड वित्तीय नुकसान

या दुर्घटनेमुळे केवळ जीवितहानीच नव्हे तर किंमती मालमत्ता, वाहने, शेतीसह हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी त्यांना सरकारकडून आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जर मला मृत्यू आला तर असाच हवा…’ गाझातील धाडसी फोटो पत्रकार फातिमा हसौनाची हृदयद्रावक कहाणी

बचाव कार्य सुरू, हवामान स्थिर होण्याची प्रतीक्षा

रामबन जिल्ह्यातील या दुर्घटनेने पुन्हा एकदा हिमालयीन भागातील हवामानाच्या अनिश्चिततेचे गंभीर वास्तव समोर आणले आहे. प्रशासन, लष्कर आणि एनडीआरएफ पथके सतत कार्यरत आहेत. हवामान स्थिर झाल्यानंतरच पूर्ण मदत आणि पुनर्वसन कार्याची गती वाढवली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Ramban jk 3 lost their lives 40 houses destroyed in floods 100 rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • jammu and kashmir news
  • Jammu Kashimir
  • Natural Disaster

संबंधित बातम्या

Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता
1

Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.