
RSS chief Mohan Bhagwat on Bangladesh Hindu violence in Kolkata News
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेमध्ये बांगलादेशमधील हिंदूवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. मोहन भागवत म्हणाले की, बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्याक आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. परंतु अथा कठीण परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तिथल्या हिंदूंनी एकजूट राहायला हवे. जगातील हिंदूंनी त्यांना मदत केलीच पाहिजे.” असे मत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक
पुढे ते म्हणाले, “आपल्याला करता येण्यासारखे जे काही आहे, ते आपण केले पाहिजे आणि आपण ते करत आहोत. भारत सरकारला बांगलादेशातील हिंदूसाठी काहीतरी करावे लागेल. कदाचित ते करतही असतीत काही गोष्टी समोर येतात, काही गोष्टी समोर येत नाहीत, कधी परिणाम दिसतात, तर कधी दिसत नाहीत. पण, त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
हे देखील वाचा : मंत्रीपद गेले तरी आमदारकी कायम राहणार;माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च दिलासा, पण…
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी बांगलादेशातील परिस्थितीचा पश्चिम बंगालवर परिणाम झाल्याचे म्हटले आहे. बंगालमधील इस्लामिक कट्टरता, हिंदूवर होणारे हल्ले, बांगलादेशातील परिस्थिती आणि बांगलादेशातील मुस्लीम नागरिकांची घुसखोरी यांचा पश्चिम बंगालवर परिणाम झाल्याचे भागवत म्हणाले. ते म्हणाले, “बांगलादेशाची सीमा खुली करायची की नाही याबाबत प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. देशात कोणाला प्रवेश द्यायचा यावर नियंत्रण असले पाहीजे. सीमा हिंदूसाठी खुली केली आणि दुसरेच येत आहेत, हे घडायला नको” असे देखील मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.
भारत हे हिंदू राष्ट्र
मोहन भागवत यांनी हिंदू राष्ट्राबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, “सूर्य पूर्वेकडून उगवतो, हे सत्य आहे. हे कधीपासून सुरू झाले हे आपल्याला माहित नसले, तरी ते मान्य करण्यासाठी आपल्याला कोणत्याही घटनात्मक मंजुरीची गरज भासत नाही. त्याचप्रमाणे हिंदुस्तान हे हिंदू राष्ट्र आहे, हे एक नैसर्गिक सत्य आहे. जोपर्यंत या मातीवर भारतीय संस्कृतीचा आदर करणारा एक व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत हे राष्ट्र हिंदू राष्ट्रच राहील.” असे विधान मोहन भागवत यांनी केले.