जयपूर : ‘हम साथ साथ है’ (Hum Sath-Sath Hai) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान (Film Shooting) म्हणजे २४ वर्षांपूर्वी शिकार (Hunt) केलेल्या काळवीटाचे स्मारक (Blackbuck Monument) उभारले जाणार आहे. या काळवीटाच्या शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानवर (Salman Khan) आरोप करण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान शिकारीसाठी गेला होता. तेव्हा या हरणाच्या शिकारीचे प्रकरण समोर आले होते.
राजस्थानातील बिष्णोई समाजाने (Bishnoi Community) आता या काळवीटाचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. काही काळापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमानने सार्वजनिक ठिकाणी जाणे बंद केले असून, त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
बिष्णोई समाजातील लोक काळ्या हरणाला देवाचा अवतार मानतात. सलमानवर काळवीट मारल्याचा आरोप असून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो शिकारीसाठी गेला होता. काळ्या हरणावर विश्वास ठेवणाऱ्या बिष्णोई समाजाने आता कांकणी गावात काळवीटाचे मोठे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.