Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Savarkar Defamation Case: सावरकर मानहानी प्रकरणात नाट्यमय वळण; राहुल गांधींच्या विरोधातील सीडी रिकामी

मॅजिस्ट्रेट शिंदे यांनी पवार यांचा आक्षेप मान्य करत सांगितले की, “भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65-ब अंतर्गत प्रमाणपत्राशिवाय कोणताही URL ग्राह्य ठरत नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 30, 2025 | 11:28 AM
Rahul Gandhi (

Rahul Gandhi (

Follow Us
Close
Follow Us:
  • सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा
  • सीलबंद लिफाफ्यातील सीडी रिकामी
  • ऑनलाइन उपलब्ध असलेला कंटेंट कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही- न्यायालय
Savarkar Defamation Case:  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मानहानी प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाने दिलासा दिल्याची माहिती समोर आली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या सुनावणी दरम्यान एक नाट्यमय घडामोडही घडली. पुण्यातील आमदार-खासदार विशेष न्यायालात राहुल गांधींविरोधात प्रमुख पुराव म्हणून एक सीडी सादर करण्यात आली. पण ही सीडी रिकामी निघाली . यामुळे न्यायालयात खळबळ उडाली.

Boat Accident : काँगोत भीषण दुर्घटना! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी एका मुलाखतीदरम्या सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या या विधानावरून सावकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. सात्यकी सावरकर यांनी सीलबंद लिफाफ्यात राहुल गांधींच्या (Rahul Gandhi ) कथित भाषणाचे रेकॉर्डिंग असलेली सीडी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केली होती. या सीडीच्या आधारे न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावण्यात आले होते.

वकिलाची मागणी फेटाळली

सात्यकी सावरकरांच्या पुराव्यांच्या तपासणीदरम्यान, जेव्हा सीलबंद लिफाफा उघडण्यात आला आणि मॅजिस्ट्रेट अमोल शिंदे यांच्या न्यायालयात सीडी लावण्यात आली तेव्हा ती पूर्णपणे रिकामी आढळली, ज्यामध्ये कोणताही डेटा नव्हता. तक्रारदार सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर हे देखील सीडी रिकामी पाहून थक्क झाले. त्यांनी न्यायालयाला आठवण करून दिली की याच सीडीच्या आधारे न्यायालयाने राहुल गांधींविरुद्ध समन्स बजावून कारवाई सुरू केली होती. त्यानंतर वकील संग्राम कोल्हटकर यांनी राहुल गांधींचे कथित वादग्रस्त भाषण युट्यूबवर स्ट्रीम करण्याची परवानगी मागितली, परंतु न्यायालयाने त्यांची विनंती स्पष्टपणे फेटाळून लावली.

अरे हे चाललंय काय? लग्नात बुट चोरण्याऱ्या नवरीच्या बहिणींशी भिडला वराचा भाऊ; शूज तोंडात धरला अन्

ऑनलाइन कंटेंटवर आक्षेप

या अनपेक्षित घडामोडीमुळे तक्रारदाराचे प्रतिनिधित्व करणारे वकील संग्राम कोल्हटकर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मते, संबंधित सीडी न्यायालयाने यापूर्वी पाहिली होती आणि ती गांधींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रमुख पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. “ती अचानक रिकामी कशी निघाली?” असा प्रश्न कोल्हटकर यांनी उपस्थित केला. सीडी रिकामी आढळल्याने न्यायालयातही एकच खळबळ उडाली. यानंतर कोल्हटकर यांनी यूट्यूबवरील भाषण पाहण्यास परवानगी देण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, राहुल गांधींचे वकील मिलिंद दत्तात्रय पवार यांनी याला तीव्र आक्षेप घेत, ऑनलाइन उपलब्ध असलेला कंटेंट कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही असा युक्तिवाद केला.

Harshwardhan Sapkal News: महायुतीच म्हणजे ‘पैसा फेक और तमाशा देख’ सारखे सुरू ; हर्षवर्धन सपकाळांनी

रिकामी सीडी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी

मॅजिस्ट्रेट शिंदे यांनी पवार यांचा आक्षेप मान्य करत सांगितले की, “भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 65-ब अंतर्गत प्रमाणपत्राशिवाय कोणताही URL ग्राह्य ठरत नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड न्यायालयात स्वीकारण्यासाठी 65-ब चे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.”

यानंतर कोल्हटकर यांनी दोन अतिरिक्त सीडी न्यायालयात सादर केल्या आणि त्यांची तपासणी खुल्या न्यायालयात करण्याची मागणी केली. पवारांनी पुन्हा आक्षेप नोंदवला आणि मॅजिस्ट्रेटांनी ही मागणीही फेटाळून लावली. सीडींमध्ये फेरफार झाल्याचा दावा करत कोल्हटकर यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आणि त्यासाठी सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली.

 

 

Web Title: Savarkar defamation case dramatic turn in savarkar defamation case cd against rahul gandhi blank

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा
1

Rahul Gandhi on Municipal Election: मतचोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य….;’ महाराष्ट्र निवडणूक आयोगावर राहुल गांधींचा निशाणा

“मोदीजी, तुम्ही तमिळ जनतेचा आवाज दाबू शकत नाही,” विजयच्या “जन नायकन” चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले राहून गांधी!
2

“मोदीजी, तुम्ही तमिळ जनतेचा आवाज दाबू शकत नाही,” विजयच्या “जन नायकन” चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले राहून गांधी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.