सध्या एक व्हिडीओ वायरल (Viral Video Of Senior Citizen Pension Withdrawal )होत आहे. ज्यात एक वृद्ध महिला रणरणत्या उन्हात मोडक्या खुर्चीचा सहारा घेत पायपीट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ ओडिशाच्या नवरंगपूरच्या सूर्या हरिजनचा आहे. त्या 17 एप्रिल रोजी त्या पेन्शनसाठी अनेक किलोमीटर पायी चालून बँकेला गेल्या होत्या.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी या महिलेचा व्हिडिओ शेअर करून बँकेला माणुसकी दाखवण्याचा सल्ला दिला. (Senior Citizen Pension Withdrawal Video)
व्हिडिओत दिसणारी 70 वर्षीय महिला मोडक्या खुर्चीच्या मदतीने कडक उन्हात चालताना दिसून येत आहे. त्यांचा मुलगा दुसऱ्या राज्यात मजुरीचे काम करतो. ती गुरेढोरे चारणाऱ्या आपल्या धाकट्या मुलासोबत राहते. त्यांचे घर म्हणजे एक झोपडी असून, त्यांच्याकडे जमीन-जुमलाही नाही.
#WATCH | A senior citizen, Surya Harijan walks many kilometers barefoot with the support of a broken chair to reach a bank to collect her pension in Odisha’s Jharigaon
SBI manager Jharigaon branch says, “Her fingers are broken, so she is facing trouble withdrawing money. We’ll… pic.twitter.com/Hf9exSd0F0
— ANI (@ANI) April 20, 2023
निर्मली सीतारामन यांचे ट्विट…
अर्थमंत्र्यांनी बँकेला विचारले – बँक मित्र नाही का?
यांनतर सीतारामन यांनी महिलेचा व्हिडिओ ट्विट केल्यावर यावर बँक मॅनेजर उत्तरे दिले आहे. वित्त विभाग व SBI ने माणुसकी दाखवत याप्रकरणी पावले उचलली. सीतारामन ने बँकेला विचारले कि बँक मित्र नाहीत? बँक मॅनेजरने उत्तर दिले की, महिलेची बोटे तुटली आहेत. त्यामुळे पैसे काढण्यात अडचण येत आहे. आम्ही लवकरच ही समस्या सोडवू.
हे पाहून आम्हालाही वाईट वाटते
अर्थमंत्र्यांच्या ट्विटनंतर SBI ने 3 ट्विट केले. त्यात त्यांचे म्हणणे हे आहे कि – हा व्हिडिओ पाहून आम्हालाही वाईट वाटत आहे. वृद्ध सूर्या हरिजन त्यांच्या गावात असलेल्या CSP पॉईंटवरून दरमहा पेन्शन काढत होत्या. पण वृद्ध असल्याने त्याच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत.त्या त्यांच्या नातेवाईकासह आमच्या झारीगाव येथील शाखेत गेल्या होत्या. आमच्या मॅनेजरने लगेचच त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे काढून दिले. बँक मॅनेजरने आम्हाला सांगितले की, आता दर महिन्याला त्यांच्या घरी पेन्शन मिळेल. या वृद्ध महिलेला व्हील चेअर देण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे.घरपोच पेन्शन देता येईल अशा लोकांची यादी तयार केली जात असल्याची माहिती झारीगावच्या सरपंचांनी दिली.
पूर्वी पेन्शन रोखीने तर आता ऑनलाइन ट्रान्सफर
पूर्वी पेन्शन रोखीने दिले जात होते. पण आता खात्यात पैसे ऑनलाइन ट्रान्सफर केले जात आहेत. बँकेने सांगितले की, कधीकधी बोटांचे ठसे जुळत नसल्यामुळे पेन्शन देण्यात अडचण येते. त्यामुळे सूर्या यांना गत 4 महिन्यांपासून पेन्शन मिळाले नाही.