Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SIR वरून देशात राजकीय रणकंदन; मात्र 42 निवृत्त न्यायमूर्ती-अधिकाऱ्यांचा ज्ञानेश कुमारांना खुलं समर्थन, विरोधी पक्षांना सुनावलं

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 42 निवृत्त न्यायमूर्ती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशवासीयांना खुले पत्र लिहिले आहे. SIR प्रक्रिया कायदेशीर असून घटनात्मक संस्थांवर पुराव्याशिवाय आरोप करू नयेत, असे आवाहन पत्रातून करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 08:34 PM
Gyanesh Kumar

Gyanesh Kumar

Follow Us
Follow Us:
  • 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुले पत्र जारी केले.
  • SIR प्रक्रिया कायदेशीर असल्याचा दावा; मृत, बोगस आणि स्थलांतरित मतदारांची नावे हटवण्याचा उद्देश असल्याचे म्हटले.
  • निवडणूक आयोग, न्यायालये आणि घटनात्मक संस्थांवर आरोप करताना पुरावे सादर करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन
 

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर राजकीय पक्षांकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत खुले पत्र जारी केले आहे. घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्यासाठी पुराव्याशिवाय मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचे प्रयत्न लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे या माजी न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

‘SIR प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर’

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून सध्या देशभरात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर या पत्रात SIR बाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

SIR ची प्रक्रिया 1950 च्या कायद्यानुसार वैध आणि कायदेशीर असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. मतदार यादीतील मृत, बोगस किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे हटवणे आणि पात्र नागरिकांची नावे समाविष्ट करणे, हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचे त्यात म्हटले आहे.

माजी न्यायमूर्ती आणि अधिकाऱ्यांच्या मते, या प्रशासकीय प्रक्रियेला राजकीय षडयंत्राचे स्वरूप देऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

घटनात्मक संस्थांवरील आरोपांबाबत नाराजी

निवडणूक आयोग आणि न्यायालयांविरोधात राजकीय व्यासपीठांवरून अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याबद्दलही पत्रात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर आरोप करणाऱ्या पक्षांनी ते न्यायालयात प्रतिज्ञापत्र आणि पुराव्यांसह मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘निवडणूक हरल्यानंतर EVM वर खापर’

EVM बाबतच्या राजकीय भूमिकेवरही या पत्रातून निशाणा साधण्यात आला आहे. एखादा पक्ष निवडणूक हरल्यानंतर EVM वर प्रश्न उपस्थित करतो; मात्र त्याच EVM च्या माध्यमातून विजय मिळाल्यास तो स्वीकारला जातो, असा टोला पत्रातून लगावण्यात आला आहे.

निवडणूक आयोग किंवा न्यायव्यवस्थेविरोधात आरोप करताना राजकीय पक्षांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

नागरिक आणि माध्यमांनाही महत्त्वाचे आवाहन

घटनात्मक संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी झाल्यास देशात अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा फायदा देशविरोधी शक्तींना होऊ शकतो, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

राजकीय पक्षांनी निवडणुका लढाव्यात, मात्र घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये. तक्रारी असल्यास त्या पुराव्यांसह न्यायालय किंवा निवडणूक आयोगासमोर मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

माध्यमांनीही कोणतीही शहानिशा न करता केवळ राजकीय दावे किंवा अफवा बातम्यांच्या स्वरूपात पुढे नेऊ नयेत, असे या पत्रात म्हटले आहे. तर नागरिकांनीही कोणत्याही राजकीय दाव्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता तथ्यांची पडताळणी करावी आणि मतदानाच्या ताकदीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Web Title: Sir process gyanesh kumar election commission open letter retired judges officers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • SIR

संबंधित बातम्या

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी
1

CJP Bengaluru Protest : SIR विरोधात हजारो आंदोलक रस्त्यावर? फ्रीडम पार्कवर ध्रुव राठी, प्रकाश राजही सहभागी

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
2

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
3

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.