नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिराचे काम आता अंतिम टप्यात आले असून, 22 जानेवारीला मंदिराचे उद्घाटन होणार आहे. राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यामध्ये राम मंदिरासाठी दान देणाऱ्या पहिल्या देणगीदारालाही निमंत्रण मिळाले आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथले सियाराम यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांचे दान दिले होते. मंदिर बांधकामासाठी पहिले देणगीदार म्हणूनच त्यांना ओळखले जाते.
सियाराम गुप्ता हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून त्यांनी 2018 मध्ये राम मंदिरासाठी 1 कोटी रुपये दिले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काशी प्रांताला त्यांनी ही रक्कम दिली होती आणि त्या नोंदीनुसार ते पहिलेच देणगीदार ठरले.