Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP Accident: स्लीपर बस रेलिंगला धडकली अन्….; भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, ५० गंभीर जखमी

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटली आहे. अपघात घडताच बसचा चालक फरार झाला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहे. अपघातग्रस्त बस ही डबल डेकर स्लीपर बस असल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 26, 2025 | 03:09 PM
UP Accident: स्लीपर बस रेलिंगला धडकली अन्….; भीषण अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू, ५० गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

इटावा: उत्तर प्रदेश राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातून जाणाऱ्या आग्रा लखनौ महामार्गावर एका प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. इटावा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी झाल्याचे समजते आहे.

बिहारच्या दरभंगा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. स्लीपर कोच असणारी ही बस थेट रेलिंगला धडकून सर्व्हिस लेनवर जाऊन आदळली.स्लीपर बसचा अपघात हा हवेलिया गावाजवळ झाला आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे 4 च्या सुमारास झाला आहे.

स्लीपर प्रवासी बस नवी दिल्लीकडे जात होती. तेव्हा पहाटे बस रेलिंगला धडकली आणि सर्व्हिस रोडवर जाऊन पलटी झाली. अपघात घडताच एकच गडबड गोंधळ उडाला. या घटनेत दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ५० जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधून एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते.

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली..; रुद्रप्रयागमध्ये अपघातांची मालिका

अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटली आहे. अपघात घडताच बसचा चालक फरार झाला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहे. अपघातग्रस्त बस ही डबल डेकर स्लीपर बस असल्याचे समजते आहे. घटना घडताच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला वेग दिला. पुढील तपास पोलिस करत आहेत.

नियंत्रण सुटले अन् 18 प्रवाशांची बस थेट अलकनंदा नदीत कोसळली

अहमदाबाद विमान अपघात तसेच केदारनाथ हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना झाली होती. यानंतर आता उत्तराखंडमधील अलकनंदा नदीमध्ये बस कोसळल्याने अपघात झाला आहे. रुद्रप्रयागमध्ये झालेल्या या अपघातामध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीमध्ये कोसळली. या अपघातग्रस्त बसमध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. यामधील सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी बचाव पथक आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

अलकनंदा नदीमध्ये बस कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये 18 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी सात प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर इतर 11 प्रवासी हे बेपत्ता झाले आहेत. त्यांचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथक, स्थानिक पोलीस, एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. यापूर्वी देखील केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये अपघात झाला आहे. सध्या या भागातील वातावरणामध्ये बदल झाला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्तराखंडमध्ये गाडी आणि हेलिकॉप्टरचे अपघात होत आहेत. नदी नाल्यांना देखील पाणी वाढले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मीडिया रिपोर्टनुसार, 18 प्रवाशांना घेऊन ही अपघातग्रस्त बस ब्रदीनाथला चालली होती. त्यावेळी चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. ही बस नदीत कोसळली. स्थानिकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस आणि एसडीआरएफचं पथक या ठिकाणी आलं. UK 08, PA 7444 या बसचा अपघात झाला आहे. या बसमध्ये चालकाहह एकूण २० जण बसलेले होते. या बसमध्ये उदयपूर (राजस्थान) आणि गुजरात येथील सोनी परिवार चारधाम यात्रेसाठी आले होते. याच बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर येत आहे.  बस अपघात स्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या गढवालमधील श्रीनगर येथील धरणाजवळ एसडीआरएफचे जवान शोध मोहीम राबवत असून नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बसमधील प्रवासी पुढे वाहून आले का याची तपासणी केली जात आहे.

Web Title: Sleeper coach bus accident two death and 50 injured agra lucknow highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Accident Death
  • Bus Accident
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप
1

Accident: इंदूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बसला लागली भीषण आग; सगळे प्रवासी सुखरूप

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
2

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
3

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
4

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.