Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk: ‘दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू…’; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका

Sonam Wangchuk : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती गंभीर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांचे सुमारे 8.5 किलो वजन घटल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2026 | 11:58 AM
'दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू...'; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका

'दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू...'; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवसांत जीवाला धोका
  • सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून दिल्ली HC मध्ये तातडीची याचिका
  • उपोषणादरम्यान दिल्ली HC मध्ये हस्तक्षेपाची मागणी
Delhi High Court on Sonam Wangchuk : शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर आहेत. त्यांचे उपोषण सक्तीने संपवून त्यांना अन्न पुरवावे, यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, त्यांचे वजन ८.५ किलोग्रॅमने कमी झाले असून, दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

ही याचिका कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली असून, त्यात म्हटले आहे की, जर त्यांनी उपोषण सुरूच ठेवले, तर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या याचिकेत केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला योग्य निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करून सक्तीने अन्न द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 Idiots सिनेमातल्या मराठमोळ्या अभिनेत्याची भावूक साद!

सोनम वांगचुक यांच्यासाठी आवाहन

या याचिकेत म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत आहे. जर त्यांचा मृत्यू झाला, तर ती देश आणि जगासाठी अत्यंत शरमेची बाब असेल. आंदोलनाच्या आयोजकांनुसार, सोनम वांगचुक यांचे त्यांच्या अनिश्चित उपोषणादरम्यान ८.५ किलोग्रॅम वजन कमी झाले आहे.

सोनम वांगचुक यांचा रक्तदाब १०७/७० mmHg पर्यंत खाली आला आहे आणि रक्तातील साखरेची पातळीही ६७ मिलीग्राम प्रति डेसिलिटरपर्यंत खाली आली आहे. लोकांचे जीवन धोक्यात असल्याचे सांगत, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारला आंदोलकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले आहे.

सोनम वांगचुक यांचा १८ व्या दिवशीही उपोषन सुरूच आहे. परिणामी खूप अशक्त दिसत आहेत. आंदोलनस्थळी एका पांढऱ्या गादीवर झोपलेले वांगचुक यांच्याभोवती डॉक्टरांचे पथक असून त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे. देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक धरणे आंदोलन करत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर हे आंदोलन सुरू झाले असून, सोनम वांगचुक यांनी त्याच्या समर्थनार्थ उपवास सुरू केला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सांगितले की, उभे राहण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना चक्कर येते.

या काळात, त्यांना शौचालयात जाण्यासाठीही खूप त्रास होत आहे. सोनम वांगचुकला प्रचंड वेदना होत असून तो मोठ्या त्रासाला सामोरे जात आहे. सध्या सर्वांचे लक्ष या जनहित याचिकेवरील न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. हे लक्षात घ्यावे की, आंदोलकांनी २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

‘तुम लढो, हम कपडा संभालते है,’ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

Web Title: Sonam wangchuk hunger strike delhi high court petition health update weight loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • delhi
  • High court
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?
1

Gopichand Padalkar यांना मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा अर्ज अवैध; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने राजकीय समीकरणे बदलणार?

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
2

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
3

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
4

CJP च्या निदर्शनाला पोलिसांची परवानगी अद्याप नाहीच; जमाव रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.