Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम लढो, हम कपडा संभालते है,’ सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या पाठिंब्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली. 'तुम लढो, हम कपडा संभालते है' म्हणत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 05:17 PM
Eknath shinde, uddhav thackeray, sonam wangchuk, cjp, cockroach janata party, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, सोनम वांगचूक आंदोलन, जंतर मंतर आंदोलन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे प्रतिक्रिया, महाराष्ट्र राजकारण, नरेंद्र मोदी, विद्यार्थी आंदोलन

Eknath shinde, uddhav thackeray, sonam wangchuk, cjp, cockroach janata party, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, सोनम वांगचूक आंदोलन, जंतर मंतर आंदोलन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे प्रतिक्रिया, महाराष्ट्र राजकारण, नरेंद्र मोदी, विद्यार्थी आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाच्या पाठिंब्यावरून शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
  • ‘राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न’ आणि अराजकता पसरवण्याचा आरोप
  • ‘बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच हिंदुत्व सुटले’ असा शिंदेंचा टोला
 

दिल्लीतील जंतर-मंतरवर शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली.

शिंदे म्हणाले, “हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्यांचा नेहमीच बाहेरून आणि घरातून पाठिंबा असतो. ‘तुम लढो, हम कपडा संभालते है’ अशी त्यांची भूमिका असते. बुडाला जळत असताना डोंगरावर आग विझवायला धावणाऱ्या माणसासारखी उबाठाची अवस्था झाली आहे.”

‘लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,’ संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?

‘सरकारविरोधी प्रत्येक आंदोलनाला उबाठाचा पाठिंबा’

एकनाथ शिंदे यांनी आरोप केला की, सरकारविरोधात जेव्हा जेव्हा आंदोलन उभे राहते, तेव्हा उद्धव ठाकरे गट त्याला पाठिंबा देत असतो. श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशातील आंदोलनांचा उल्लेख करून उबाठा गट मुद्दाम अशी उदाहरणे देत असल्याचाही त्यांनी आरोप केला.

‘राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न’

शिंदे म्हणाले की, देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गट स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. देशात अराजकता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, अशी त्यांची इच्छा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत, देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे आणि ३२ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणल्याचा दावा केला.

‘युवा वर्ग मोदींसोबत’

युवकांचा विश्वास अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याचा दावा करत शिंदे म्हणाले की, २०१४ पूर्वीचे घोटाळे आणि त्यानंतर झालेली विकासकामे युवकांनी पाहिली आहेत. त्यामुळे युवक मोदी सरकारच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

Union Cabinet Expansion:   एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने राजकीय वातावरण तापले

‘बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच हिंदुत्व सुटले’

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “आधी हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. कितीही हिंदुत्वाचा आव आणला तरी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले तेव्हाच त्यांचे हिंदुत्वही सुटले,” असा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Eknath shinde slams uddhav thackeray over support to sonam wangchuk protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Sonam Wangchuk
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका
1

Eknath Shinde Press Conference: ‘कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस’; एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
2

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
3

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
4

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.