Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती

अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमतेचा उपयोग करण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांवरून वाढविण्याचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 09, 2026 | 03:19 PM
साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती

साखर निर्यात सुरूच राहणार, विक्री किंमत वाढविण्याचा विचार सुरू; केंद्राची महत्त्वपूर्ण माहिती

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही आणि किमान विक्री वाढवण्याच्या उद्योगाच्या मागणीवर सरकार विचार करत आहे, असे सचिव संजीव चोप्रा यांनी मंगळवारी सांगितले. साखरेचे भाव स्थिर आहेत आणि पुरेशा देशांतर्गत पुरवठ्यामुळे भावात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही.

अतिरिक्त इथेनॉल उत्पादन क्षमतेचा उपयोग करण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या २० टक्क्यांवरून वाढविण्याचा समावेश आहे. खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. सध्या काढणी सुरू असलेले गव्हाचे पीक यावर्षी चांगले आहे. अलीकडील पावसामुळे सरकार अन्नधान्य खरेदीसाठीचे गुणवत्ता निकष शिथिल करू शकते.

सध्या तरी साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे चोप्रा यांनी येथील परिषदेदरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी संभाव्य निर्यात बंदीच्या वृत्तांविषयी त्यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक किमती मजबूत झाल्यात. त्यामुळे भारताच्या निर्यातीच्या शक्यता सुधारल्या आहेत. जर निर्यात मंजूर प्रमाणापेक्षा कमी झाली, तर अंतिम साखरेचा साठा अधिक असेल.

Adhir Ranjan Accident : पश्चिम बंगालच्या राजकारणाला सुडाची लागण? प्रचारानंतर अधीर रंजन चौधरींच्या गाडीला ट्रकची धडक

परिणामी, पुढील विपणन वर्षांत अधिक साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी लवचिकता मिळेल. साखरेची किमान विक्री किंमत ३१ रुपये प्रति किलोवरून वाढवण्याच्या उद्योगाच्या मागणीबाबत ते म्हणाले, अन्न मंत्रालय या प्रस्तावावर विचार करत आहे.

साखरेच्या किमती स्थिर

इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे २०१४ पासून १.७५ लाख कोटींची भरीव परकीय चलन बचत झाली. साखरेच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. किमतींमध्ये कोणतीही मोठी वाढ किंवा दरवाढ होण्याची मला अपेक्षा नाही. ऊस थकबाकीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि निर्यात व इथेनॉल मिश्रण कार्यक्रमातून रोख रक्कम मिळत असल्याने साखर कारखाने शेतकऱ्यांना पैसे देतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Sugar exports to continue consideration underway to increase selling price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • national news
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान
1

One Nation One Election: एकाच वेळी ११ राज्यांत निवडणुकांची तयारी? २०२९ मध्ये देशात एकाच वेळी मतदान

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी
2

Sugar Stocks Price : साखरेने खाल्ला भाव… बाजारात दर वाढताच शेअर मार्केटमध्येही धुमाकूळ! शुगर शेअर्समध्ये तुफान तेजी

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले
3

ISRO Rocket Production: इस्रो आता रॉकेट बनवणार नाही!; खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचे दरवाजे खुले

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
4

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.