Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीवरील ‘बंदी’ला तुर्तास ब्रेक

500 Meter Rule: राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतरातील १,१०२ दारू दुकाने हटवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 19, 2026 | 07:13 PM
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीवरील 'बंदी'ला तुर्तास ब्रेक (photo Credit- X)

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यविक्रीवरील 'बंदी'ला तुर्तास ब्रेक (photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • हायवेवरील दारू दुकाने तुर्तास वाचली!
  • ५०० मीटरच्या परिघातील दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
  • नेमक प्रकरण काय?
नवी दिल्ली: राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांपासून ५०० मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे महामार्गालगत असलेल्या १,१०२ दारू दुकानांच्या मालकांना आणि राज्य सरकारला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

नेमकी पार्श्वभूमी काय?

राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला होता. ‘कन्हैया लाल सोनी विरुद्ध राजस्थान राज्य’ या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी आणि न्यायमूर्ती संजीत पुरोहित यांनी रस्ते अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली होती. महामार्गांजवळ दारू सहज उपलब्ध होत असल्याने अपघात वाढतात, असे नमूद करत न्यायालयाने महापालिका आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील ५०० मीटर अंतरातील सर्व दारू दुकाने ओळखून ती स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयात काय झाला युक्तिवाद?

उच्च न्यायालयाच्या या आदेशाला राजस्थान सरकार आणि मद्य परवानाधारकांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष रजा याचिकेद्वारे (SLP) आव्हान दिले होते. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अतिरिक्त महाधिवक्ता शिव मंगल शर्मा यांनी युक्तिवाद केला की, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या ‘तामिळनाडू राज्य विरुद्ध के. बालू’ या ऐतिहासिक खटल्यातील मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्च २०१७, ११ जुलै २०१७ आणि २३ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशांद्वारे मूळ नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली होती.

Supreme Court on atrocity : केवळ अपमानस्पद शब्द वापरले म्हणून गुन्हा नाही..! अ‍ॅट्रॉसिटी बाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान

कायदेशीर पेच

उच्च न्यायालय कलम २२६ चा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने कलम १४१ अंतर्गत घोषित केलेल्या कायद्याला रद्दबातल ठरवू शकत नाही, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही मद्य व्यावसायिकांच्या वतीने याच मुद्द्यांवर भर दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिली. “या प्रकरणाची सखोल सुनावणी सर्व पक्षांचे सविस्तर जबाब नोंदवल्यानंतरच केली जाईल,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे तुर्तास ही दुकाने आहे त्याच ठिकाणी सुरू राहणार आहेत.

उच्च न्यायालयाची चिंता आणि महसुलाचा प्रश्न

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मानवी हानीवर भर दिला होता. संविधानाच्या कलम २१ (जीवितातचा अधिकार) चा संदर्भ देत न्यायालयाने म्हटले होते की, २,१०० कोटी रुपयांच्या संभाव्य महसूल नुकसानापेक्षा सार्वजनिक सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे. शहरी विस्ताराचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाची सुरक्षा मानके शिथिल केली जाऊ शकत नाहीत, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, महामार्गालगतच्या मद्यविक्री धोरणाबाबत कायदेशीर स्पष्टता येण्यासाठी पुढील सुनावणी महत्त्वाची ठरणार आहे.

भाजप पक्षामध्ये लोकशाही की हुकूमशाही? कशी होते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

Web Title: Supreme court stays high court order on highway liquor shops removal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • liquor shops
  • rajasthan
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on atrocity : केवळ अपमानस्पद शब्द वापरले म्हणून गुन्हा नाही..! अ‍ॅट्रॉसिटी बाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान
1

Supreme Court on atrocity : केवळ अपमानस्पद शब्द वापरले म्हणून गुन्हा नाही..! अ‍ॅट्रॉसिटी बाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वपूर्ण विधान

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…
2

Rajasthan Crime: महाराष्ट्रातील तरुणीवर उदयपूरमधील फार्महाऊसवर सामूहिक अत्याचार, इव्हेंटसाठी बोलावले अन्…

‘दबंगगिरी’ करणाऱ्या CM ममता बॅनर्जींना ED प्रकरणात मोठा दणका; 2 आठवड्यात…, सुप्रीम कोर्टाचे आदेश
3

‘दबंगगिरी’ करणाऱ्या CM ममता बॅनर्जींना ED प्रकरणात मोठा दणका; 2 आठवड्यात…, सुप्रीम कोर्टाचे आदेश

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच
4

US Supreme Court on Tariff: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुन्हा लांबणीवर! ट्रम्प यांनी लादलेल्या अतिरिक्त शुल्कावर न्यायालयीन पेच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.