Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OBC Reservation: ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम धर्मांतर! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष; पाहा कायदेशीर बाजू

OBC Reservation : मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन आणि न्यायमूर्ती पी. बी. बालाजी यांच्या खंडपीठाने संबंधित सरकारी आदेश रद्द केला. हा आदेश सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या बंधनकारक निर्णयांशी विसंगत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 09, 2026 | 05:58 PM
CJI Surya Kant Supreme Court Metro, SCBA Vikas Singh Metro Station Request,

CJI Surya Kant Supreme Court Metro, SCBA Vikas Singh Metro Station Request,

Follow Us
Follow Us:

Supreme Court on OBC Reservation:  धर्मांतर करून इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तींना इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाचा लाभ मिळावा की नाही, याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. या प्रकरणी तमिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका (एसएलपी) दाखल केली आहे.

हे प्रकरण २०२४ मध्ये तमिळनाडू सरकारने जारी केलेल्या आदेशाशी संबंधित आहे. या आदेशानुसार, मागासवर्गीय (BC), अतिमागासवर्गीय (MBC), विमुक्त समुदाय (DNC) आणि अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील व्यक्तींनी इस्लाम धर्म स्वीकारल्यास, त्यांना राज्यात अधिसूचित सात मुस्लिम मागासवर्गीय समुदायांपैकी एका समुदायाचे सदस्य मानून समुदाय प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याआधारे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत होता.

Satara Water Crisis: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे ‘कास’ योजनेची मुख्य जलवाहिनी

मात्र, मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा सरकारी आदेश रद्द केला. यावेळी न्यायालयाने “धर्मांतरानंतर संबंधित व्यक्तीची ओळख केवळ मुस्लिम म्हणून राहते. त्यामुळे त्याला किंवा तिला विशिष्ट मुस्लिम मागासवर्गीय समुदायाचा सदस्य मानून आरक्षणाचा लाभ देता येणार नाही.” असे आपल्या निर्णयात म्हटले होते.

मद्रास उच्च न्यायालयाने काय म्हटले?

मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती जी. आर. स्वामिनाथन आणि न्यायमूर्ती पी. बी. बालाजी यांच्या खंडपीठाने संबंधित सरकारी आदेश रद्द केला. हा आदेश सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या बंधनकारक निर्णयांशी विसंगत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. केवळ इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे एखादी व्यक्ती ओबीसी आरक्षणासाठी अधिसूचित ‘मागासवर्गीय मुस्लिम’ समुदायाची सदस्य ठरत नाही. धर्मांतरानंतर ती व्यक्ती मुस्लिम म्हणून ओळखली जाईल; मात्र, संबंधित मागासवर्गीय मुस्लिम समुदायाचा सदस्य असल्याचे स्वतंत्रपणे सिद्ध करणे आवश्यक आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव? थेट इंडिया आघाडी विरोधात जाऊन आता…

हा निर्णय समीर अहमद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात आला. समीर यांनी २०१५ मध्ये हिंदू धर्माचा त्याग करून इस्लाम धर्म स्वीकारला होता. २०१६ मध्ये त्यांच्या धर्मांतराची राजपत्रात नोंद करण्यात आली. त्यानंतर त्यांनी इस्लामी पद्धतीने विवाह केला आणि ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून स्वतःला ‘मुस्लिम लेब्बाई’ समुदायाचा सदस्य घोषित करणारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र, तहसीलदाराने त्यांचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

तमिळनाडू सरकारची भूमिका

तमिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात, संबंधित सरकारी आदेश हा मागासवर्ग आयोगाच्या शिफारशींवर आधारित होता. केवळ धर्मांतर केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आरक्षणाचा हक्क संपुष्टात येऊ नये, हा या आदेशामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. आता या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Supreme court to decide obc reservation status for converts to islam tamil nadu case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • Madras High Court
  • OBC Reservation
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

‘लिव्ह इन’ हे विवाहाच्या समकक्ष, पालकसुद्धा त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत; दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
2

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

Supreme Court on CJP Protest:जंतरमंतरवरील आंदोलन, महिला, मुलींचे लैंगिक छळ…; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Delhi Police on CJP Protest:  संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
4

Delhi Police on CJP Protest: संसद मोर्चा बेकायदेशीर; जंतरमंतर लाठीचार्जबाबत दिल्ली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.