Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu Politics : भाजप अध्यक्षपदाचा सस्पेन्स आणखी वाढला; ‘ही’ नावं आहेत सध्या चर्चेत

अन्नामलाई राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय राजकारणात प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा झाली. तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत मुरुगन यांच्याशिवाय आमदार नैनर नागेंद्रन यांचे नाव पुढे आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2025 | 08:05 AM
भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत

भाजपाला नवा अध्यक्ष २१ जुलैपर्यंत

Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई : तामिळनाडूमध्ये भाजपचा पुढचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल? सर्वांच्या नजरा यावर आहेत. याचे कारण म्हणजे भाजपचे विद्यमान अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आपण नेतृत्वाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अन्नामलाई यांच्या या घोषणेनंतर, केंद्रीयमंत्री मुरुगन यांचे नाव सर्वात आधी पुढे आले.

मुरुगन नवीन अध्यक्ष होण्यामागील युक्तिवाद म्हणजे त्यांचे अण्णा द्रमुकशी चांगले संबंध आहेत. अन्नामलाई राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय राजकारणात प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा झाली. तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत मुरुगन यांच्याशिवाय आमदार नैनर नागेंद्रन यांचे नाव पुढे आले होते. जयललिता यांच्या निधनानंतर भाजपमध्ये सहभागी झालेले नागेंद्रन सध्या विधानसभेतील भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. 2021 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर तिरुनेलवेली जागा जिंकली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा चेन्नईत पोहोचण्याच्या काही तास आधी भाजपने नवीन अध्यक्ष निवडीच्या निकषांची घोषणा केली. यामध्ये पक्षाने म्हटले आहे की, निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना किमान 10 वर्षे पक्षाचे सदस्यत्व आवश्यक असेल. या नियमानंतर, नवीन पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले एन. नागेंद्रन यांनाही शर्यतीतून बाहेर राहावे लागले.

ऑगस्ट 2017 मध्ये ते अण्णा द्रमुकमधून पक्षात सहभागी झाले. अशा परिस्थितीत, त्यांनी भाजपचे सदस्य म्हणून 10 वर्षे पूर्ण केलेली नाहीत. आता अशी चर्चा आहे की, पक्ष एखाद्या संघटनेशी संबंधित चेहऱ्याकडे कमान सोपवू शकतो. सध्या राज्यात द्रमुक आणि काँग्रेस युती सत्तेत आहे. पुढील वर्षी राज्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीला 11 महिने शिल्लक आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुक एकत्र आल्यानंतर, अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके काय करणार याची चर्चा सुरू आहे.

या शर्यतीत कोण-कोण?

भाजप 13 एप्रिल रोजी तामिळनाडूच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. नैनार नागेंद्रन यांचे नाव आतापर्यंत आघाडीवर होते, पण पक्ष अण्णाद्रमुकमधून आलेल्या नेत्याकडे संघटनेची कमान सोपवेल का? ते पाहणे गरजेचे असेल. नागेंद्रन हे थेवर समुदायाचे आहेत. अशा परिस्थितीत भाजप काही नवा धक्का देऊ शकते. सर्वांच्या नजरा यावर खिळल्या आहेत. अध्यक्षपदाच्या दावेदार वनाथी श्रीनिवासन आणि तमिलिसाई सुंदरराजन यांची नावे आहेत.

Web Title: Suspense over bjp president post increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • BJP Politics
  • indian politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
1

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Bihar Election Result: बिहारमध्ये दोन दशकांत राजकीय समीकरणे कशी बदलली?  भाजप-जेडीयूच्या विजयाची १५ कारणे
2

Bihar Election Result: बिहारमध्ये दोन दशकांत राजकीय समीकरणे कशी बदलली? भाजप-जेडीयूच्या विजयाची १५ कारणे

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची
3

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची

मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख जाणार भाजपमध्ये; म्हणाले, ‘गावाच्या विकासासाठी मी…’
4

मोहिते-पाटील यांचे कट्टर समर्थक बाबाराजे देशमुख जाणार भाजपमध्ये; म्हणाले, ‘गावाच्या विकासासाठी मी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.