
Four BJP candidates win even before the elections,
BJP Politics: महापालिका निवडणुकांसाठी काल (30 डिसेंबर) उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. राज्यात येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी मतदान होण्यापूर्वीच भाजपचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली मबहापालिकेत २, पनवेलमध्ये १ आणि धुळे महापालिकेत १ उमेदवार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
भाजप-शिवसेनेची डोकेदुखी वाढणार? केंद्रात सत्तेत असलेला ‘हा’ पक्षही निवडणुकीच्या रिंगणात
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली. तर काहीं उमेदवारानी निवडणुकीपूर्वीच विजय मिळवला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म आहे. तर पनवेल महापालिका आणि धुळे (dhule) महापालिकेतही भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील प्रभाग क्रं. १८ ब मधून बिनविरोध नगरसेवक पदावर निवडून आले आहेत. (BJP Politics)
अर्ज सादर केल्यानंतर आज अर्ज छाननीचा दिवस आहे. दरम्यान, धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी उज्वला भोसले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. आज अर्ज छाननीवेळी त्यांच्या विरोधातील चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आल्या. उज्वला भोसले या धुळे महापालिकेत नगरसेवक पदी निवडून आलेल्या पहिल्याच उमेदवार आहेत, विशेष म्हणजे एकाच दिवसात भाजप प्रवेश करून दुसऱ्या दिवशी नगरसेवक पदी निवडून आल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे. (Maharashtra Municipal Elecction 2025)
India-Bangladesh Ties: भारताचे ‘स्ट्रॅटेजिक’ पाऊल! Khaleda Zia यांच्या अंत्यसंस्काराला जयशंकर यांची
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रेखा चौधरी यांचा विजय बिनविरोध निश्चित झाला आहे. तसेच प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे यांनीही बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक २६ ‘क’ मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधातही कोणताही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
मुंबईतील वॉर्ड क्रमांक २११ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. तर वॉर्ड क्रमांक २१२ मध्ये भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरवण्यात आला आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या कार्यालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज नामंजूर केला.
या वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीकडून मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, काँग्रेससह अन्य पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी ठाकरे बंधूंच्या एकत्रित ताकदीमुळे श्रावणी हळदणकर यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने मुंबईत मनसेला पहिल्या विजयाची चाहूल लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.