Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live: तामिळनाडूत राजकीय भूकंप! एम. के. स्टॅलिन यांचा बालेकिल्ल्यात पराभव

एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. ते तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: May 04, 2026 | 04:45 PM
MK Stalin Defeat, Kolathur Result 2026, VS Babu TVK, Thalapathy Vijay

MK Stalin Defeat, Kolathur Result 2026, VS Babu TVK, Thalapathy Vijay

Follow Us
Follow Us:

Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live : तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री आणि सत्ताधारी द्रमुक पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन कोलाथूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. कोलाथूर मतदारसंघ स्टॅलिन यांचा बालेकिल्ला मानला जात होता, या मतदरसंघातून त्यांनी सलग तीन वेळा (२०११, २०१६ आणि २०२१) विजय मिळवला होता. विजय थलपथी यांच्या पक्षाचे, तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) चे उमेदवार आणि स्टॅलिन यांचे दीर्घकाळचे सहकारी व्ही. एस. बाबू यांच्याकडून ते पराभूत झाले आहेत. यापूर्वी, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एम. के. स्टॅलिन यांनी एआयएडीएमकेचे आदी राजाराम यांचा पराभव केला होता.

व्ही. एस. बाबू यावर्षी टीव्हीकेमध्ये दाखल

व्ही. एस. बाबू पूर्वी द्रमुकचे आमदार होते. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत कोलाथूर मतदारसंघासाठी एम. के. स्टॅलिन यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर होती, परंतु नंतर त्यांनी पक्ष सोडून एआयएडीएमकेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी, ते विजय थलपथी यांच्या टीव्हीके (TVK) पक्षात सामील झाले.

Tamil Nadu Assembly Election Results 2026 Live: पेरम्बूरमधून विजय थलपती ५८६५ मतांनी आघाडीवर; तामिळनाडूच्या राजकारणात नवी क्रांती

 कोलाथूर मतदारसंघातून स्टॅलिन  सलग तीन वेळा विजयी

एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. ते तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत. २०१८ मध्ये करुणानिधींच्या निधनानंतर, त्यांनी डीएमके (DMK) पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले. २०११ मध्ये, विल्लिवाक्कम आणि पुरासवाक्कम मतदारसंघांचे काही भाग एकत्र करून कोलाथूर विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. या मतदारसंघाच्या निर्मितीपासून एम.के. स्टॅलिन हे आमदार आहेत.

स्टॅलिन यांचा पराभव पण मुलाची बालेकिल्ल्यात कडवी झुंज

तामिळनाडूतील चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा मतदारसंघ यावेळीही अत्यंत चुरशीचा ठरला आहे. हा मतदारसंघ डीएमके पक्षाचा बालेकिल्ला असून, तो राखण्याची जबाबदारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि उपमुख्यमंत्री, उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर आहे.

Tamilnadu  Assembly Election 2026 Result: तामिळनाडूचा नवा ‘थलैवा’ कोण?

सुरुवातीच्या निकालांनुसार (चेपॉक-तिरुवल्लिकेनी विधानसभा निवडणूक निकाल २०२६), ते विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे उमेदवार डी. सेल्वम यांच्यापेक्षा मागे होते, परंतु आता त्यांनी पुनरागमन केले आहे. मतमोजणीच्या ११ फेऱ्यांनंतर, त्यांनी (उदयनिधी स्टॅलिन) डी. सेल्वम यांना ४,३१९ मतांनी मागे टाकले आहे. पण याठिकाणची लढत चांगलीच चुरशीची झाली आहे.

आपला राजकीय वारसा जपण्याची उदयनिधी यांची जबाबदारी

चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघ हा डीएमकेचा बालेकिल्ला मानला जातो. २००८ मध्ये स्थापनेपासून डीएमके पक्ष येथे जिंकत आला आहे आणि स्वतः उदयनिधी स्टॅलिन यांनी मागील निवडणूक जिंकली होती. स्टॅलिन यांचे आजोबा, पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी, पूर्वीच्या चेपॉक मतदारसंघातून अनेक वेळा आमदार होते.

चेपॉक-तिरुवल्लिकेनी हा चेन्नई सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. हा एक दाट लोकवस्तीचा, शहरी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा परिसर आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात २,३४,०६७ मतदार होते.

 

 

 

Web Title: Tamil nadu assembly election results 2026 live massive upset in tamil nadu cm mk stalin defeated in his stronghold kolathur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • M K stalin
  • national news
  • Tamil Nadu Election Result 2026

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल
2

Supreme Court News: सत्र न्यायालयांच्या अधिकारांना सर्वोच्च न्यायालयाची कात्री! जन्मठेपेच्या शिक्षेबाबत दिला ऐतिहासिक निकाल

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.