Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Poisoning: 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा; मुलांनी व्यवस्थापनावर केले ‘हे’ गंभीर आरोप

जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2025 | 05:59 PM
Food Poisoning: 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा; मुलांनी व्यवस्थापनावर केले ‘हे’ गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

तेलंगणा राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तेलंगणा राज्यातील जाडचेरला येथील  नरसी मोनजी इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) च्या अनेक विद्यार्थ्यांना खाण्यातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या या विद्यार्थ्यांचा आकडा 80 पेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. जेवण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप,पोटदुखी अशी लक्षणे आढळून आली. दरम्यान या प्रकरणात विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

दरम्यान, NMIMS च्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना रूग्णालयात नेण्याऐवजी ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका खाजगी डॉक्टरने विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या आणि कॉमन रूमच्या जवळ या विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार केले, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार, पी. अनिरुद्ध रेड्डी यांनी संस्थेत जाऊन तेथील संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉक्टरांच्या पात्रतेवर आणि वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेवर प्रश्न उपस्थित करत आमदारांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंटवर गंभीर आरोप

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांकडून समोर आलेल्या निवदेनानुसार, प्रशासनाचे अपयश केवळ सुरक्षित आणि स्वच्छ अन्न पुरवण्यापुरते मर्यादित नव्हते. विद्यार्थ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिका देखील उपलब्ध नव्हती. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनावर दबाव आणला तेव्हा रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली.

हेही वाचा: फूड पॉयझनिंग आणि त्याचे लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

विद्यार्थ्यांकडून खाण्याच्या गुणवत्तेवर शंका 

विश्वविद्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या अन्नाबाबत विद्यार्थ्यांनी आवाह उठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.  ही काही पहिल्यांदा घडलेली घटना नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. मेसमध्ये दिले जाणारे जेवण, किराणा सामान, भाज्या आणि स्वयंपाकाच्या तेलाच्या निकृष्ट दर्जाबद्दल विद्यार्थ्यांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.

फूड पॉयझनिंग आणि त्याचे लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

फूड पॉयझनिंग म्हणजे विषारी अन्न किंवा पाणी पिऊन होणारे आजार. हे पचन संस्थेवर परिणाम करते आणि काही लक्षणे आपल्याला जाणवू लागतात. चला, त्याच्या काही प्रमुख लक्षणांची माहिती पाहूयात. अशी अनके लक्षणे आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण आपल्याला याचा त्रास होत आहे का? हे जाणून घेऊ शकतो. फूड पॉयझनिंग झाल्यावर आपले शरीर काही संकेत देतात. ते कोणते? चला तर मग जाणून घेऊयात.

खराब किंवा कालबाह्य अन्न पदार्थांमध्ये जिवाणूंचे प्रमाण जास्त असू शकते, ज्यामुळे सॅल्मोनेला किंवा ई. कोली सारख्या विषाणूंमुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. त्यासाठी अन्नाचे उत्पादन तारीख आणि योग्य साठवण तपासणे महत्त्वाचे आहे. काही औषधं, जसे की ऍंटीबायोटिक्स, आपल्या पचनसंस्थेच्या नैसर्गिक संतुलनाला बाधा आणू शकतात, ज्यामुळे जास्त चव लागण्याचा आणि फूड पॉयझनिंग होण्याचा धोका वाढतो. औषधांचा योग्य वापर आणि त्यांचे expiry डेट तपासणे आवश्यक आहे.

 

Web Title: Telangana nmims more than 80 students suffer to food poisoning students allegations to management marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • food poisoning news
  • Student
  • Telangana

संबंधित बातम्या

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा
1

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, चांगल्यातील चांगले अन्नही होऊ शकते 5 चुकांमुळे विष
2

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, चांगल्यातील चांगले अन्नही होऊ शकते 5 चुकांमुळे विष

New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा
3

New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.