Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Students Mental Health: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी स्थापले टास्क फोर्स; नेमके काय करणार काम? जाणून घ्या एका क्लिकवर

National Task Force Students Mental Health: सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली राष्ट्रीय टास्क फोर्स उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करत आहे. १० राज्यांमधील ३० संस्थांना भेटी देऊन त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 01, 2026 | 12:29 PM
mental health

mental health

Follow Us
Follow Us:

National Task Force Students Mental Health: देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली राष्ट्रीय टास्क फोर्स सातत्याने प्रत्यक्ष पातळीवर काम करत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२५ पासून आतापर्यंत या टास्क फोर्सने १० राज्यांमधील ३० उच्च शिक्षण संस्थांना भेटी दिल्या आहेत. या भेटींदरम्यान टीमने विद्यार्थी, शिक्षक आणि इतर संबंधित घटकांशी संवाद साधून, विद्यार्थी कोणत्या कारणांमुळे मानसिक तणावाचा सामना करत आहेत आणि आत्महत्यांसारख्या घटना का वाढत आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रीय टास्क फोर्सचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे नसून विद्यार्थ्यांच्या वास्तविक समस्या समजून घेणे हा आहे. याच कारणामुळे ही टीम वेगवेगळ्या राज्यांत आणि शिक्षण संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकत आहे.  आज पर्यंत अनेक बैठकींचे आयोजन केले आहे जेणेकरून विद्यार्थी कल्याणासाठी एक व्यापक आणि सर्वसमावेशक रणनीती तयार करता येईल. या बैठकांमध्ये शिक्षक, तज्ज्ञ, संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत.

कोणत्या मुद्द्यांवर झाली सर्वाधिक चर्चा?

बैठका आणि दौऱ्यांदरम्यान महाविद्यालयांमधील मानसिक आरोग्य मदत यंत्रणा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे, लैंगिक समानतेशी संबंधित मुद्दे, जातीय भेदभाव आणि अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांसमोर येणारी आव्हाने, सामाजिक, शैक्षणिक आणि संस्थात्मक पातळीवर कोणत्या समस्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न टास्क फोर्स करत आहे.

National Doctors Day : १ जुलैलाच का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास..

दिव्यांग आणि कायद्याच्या विद्यार्थ्यांना का जोडले गेले?

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि मानसिक आरोग्याबाबत वाढती चिंता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली होती.

सध्या टास्क फोर्सने दिव्यांग विद्यार्थी आणि शिक्षकांशी संबंधित मुद्द्यांवरही विशेष चर्चा केली आहे. या प्रक्रियेत कायद्याच्या विद्यार्थ्यांनाही समाविष्ट करण्यात आले, जेणेकरून मानसिक आरोग्य आणि आत्महत्येशी संबंधित कायदेशीर पैलू अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. यामुळे भविष्यात केल्या जाणाऱ्या शिफारसी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.

PM Narendra Modi security: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल; ‘हे’ आयपीएस ऑफिसर सांभाळणार त्यांच्या सुरक्षेची धुरा!

यामुळे विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार?

राष्ट्रीय टास्क फोर्स आपल्या अंतिम अहवालात अशा सुधारणांची शिफारस करेल, ज्यामुळे शिक्षण संस्थांची जबाबदारी वाढेल, आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील आणि विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित व आश्वासक वातावरण मिळेल. सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यावर या अहवालाचा भर असेल. या शिफारसी लागू झाल्यानंतर, देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मानसिकदृष्ट्या सुरक्षित आणि उत्तम शैक्षणिक वातावरण तयार होऊ शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Supreme court national task force college students mental health suicide prevention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • mental health
  • Student
  • Suprim court

संबंधित बातम्या

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
2

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.