Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिट अँड रनच्या कायद्याविरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर टेम्पो, ट्रक चालकांचे आंदोलन सुरूच

जुलमी कायदा रद्द होईपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच ;  सरकारने आमच्याशी चर्चा करावी, आंदोलन तोडण्याचा प्रयत्न करू नये : बाबा कांबळे

  • By Aparna
Updated On: Jan 04, 2024 | 10:02 PM
हिट अँड रनच्या कायद्याविरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर टेम्पो, ट्रक चालकांचे आंदोलन सुरूच
Follow Us
Follow Us:

दिल्ली : राज्यातील ट्रक, टेम्पो चालकांच्या विरोधात अन्यायकारक कायदा आणलेला रद्द करावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच आहे. करणे आमच्याशी चर्चा करून योग्य तोडगा काढावा. आंदोलन तोडण्याचे प्रयत्न करू नयेत. जुलमी कायदा रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार ऑटो, रिक्षा, बस, ट्रक,  टेम्पो फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो, बस, ट्रक, टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

बाबा कांबळे म्हणाले की, देशभरातील प्रवासी व मालवाहतूक चालक-मालकांचे  आंदोलन सुरू राहणार आहे. कोणीही माघार घेतलेली नाही. देशातील 25 कोटी चालक-मालकांचे आमची संघटना प्रतिनिधित्व करत आहे. केंद्राने हिट अँड रन प्रकरणी दहा वर्षे शिक्षा व सात लाख रुपये दंड करण्याचा कायदा केला आहे. तसेच राष्ट्रीय चालक आयोग, वेल्फेअर बोर्ड, ड्रायव्हर डे व इतरही प्रश्न महत्त्वाच्या प्रश्नांवर  आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नांवरती ड्रायव्हर आक्रमक झाले आहे. मूळ प्रश्नांवर चर्चा करावी. मोठे उद्योगपती ट्रान्सपोर्ट मालकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले आहे असे चुकीच्या पद्धतीने शासन जाहीर करत आहे. ही देशातील 25 कोटी चालक-मालकांची दिशाभूल आहे. ज्यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही, असे देशातील मोठे उद्योगपती भांडवलदार ट्रान्सपोर्टर्स यांना हाताशी धरून आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अधिक उग्र होईल, असा इशारा मालवाहतूक प्रवासी चालक-मालकांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिला.

पिंपरी चिंचवड, पुणेसह महाराष्ट्रातून पाठिंबा

कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 पासून  जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकार ने हिट अँड रन कायद्यास विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातून ऑटो व ट्रक टेम्पो चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संबधित आरटीओ कार्यालयावर आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला आहे.

पिंपरीतील आंदोलनात बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे, संतोष गुंड, शुभम तांदळे, विनायक ढोबळे, हिराराम गवारे, तुषार लोंढे, अजय साळवे, रोहिदास पिंगळे, पप्पु गवारे, अविनाश जोगदंड, दादा किवळे, देवा चव्हाण, घरकाम महिला अध्यक्षा आशा कांबळे, मधुरा डांगे, राणी तांगडे, अंजली कांबळे आदी सहभागी झाले होते.

संघटनेच्या मागण्या

अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Tempo truck drivers protest at jantar mantar in delhi against hit and run law

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2024 | 10:02 PM

Topics:  

  • delhi

संबंधित बातम्या

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक
1

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
2

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
3

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
4

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.