Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

fake call center : दिल्ली पोलिसांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटर टोळीचा भांडाफोड केला आहे. ही टोळी अॅप्पल कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांना गिफ्ट कार्डच्या माध्यमातून फसवणूक करायचे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 30, 2026 | 03:50 PM
fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

fake call center : अमेरिकन नागरिकांना टार्गेट करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड, 7 जणांना अटक

Follow Us
Follow Us:
  • बनावट कॉल सेंटरवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
  • अॅपल कंपनीच्या नावे अमेरिकन नागरिक टार्गेटवर
  • नेटवर्कचे जाळे दिल्ली पसरल्याचा पोलिसांना संशय
दिल्ली पोलिसांनी नारायणा इंडस्ट्रियल परिसरात एका बनावट अॅप्पल/आओएस टेक्निकल सपोर्ट कॉल सेंटर (fake call center) चा भांडाफोड केला आहे. येथून फसवणूकीचे कॉल आणि गिफ्ट कार्ड स्कॅमच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.

25 सप्टेंबरला उपनिरीक्षक गजेंद्र माथूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वेस्ट डिस्ट्रिक्टच्या अँटी ऑटो थेफ्ट स्क्वॉडच्या एका पथकाने नारायणा इंडस्ट्रियन परिसरातील वेप्ट्रा नावाने सुरू असलेल्या संशयित इंटरनॅशनल टेक सपोर्ट बनावट कॉल सेंटरवर छापा मारला. छापेमारीदरम्यान कॉल सेंटरचा कथित मालक असलेल्या अरुण, त्याचा पार्टनर सलीम आणि पाच कॉलर्सला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, हे कॉलर्स अमेरिकन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी लॅपटॉप आणि हेडफोनचा वापर करायचे व खोटे इंग्रजी नावे सांगायचे.

विविध कलमांतर्गत अटक

ऑपरेशननंतर 26 सप्टेंबरला नारायणा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले. हा एफआयआर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) चे कलम 318 (4), 319 (2), 61 (2), 3(5) आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टचे कलम 66 डी अंतर्गत नोंदवण्यात आले आहे.
सुरुवातीच्या तपासात असे समोर आले की, आरोपी अमेरिकेच्या लोकांना लक्ष्य बनवण्यासाठी एक खोट्या अॅप्पल/आयओएस टेक्निकल सपोर्ट सेटअप चालवायचे. ते कथितरित्या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून अमेरिकामध्ये राहणाऱ्या लोकांशी संपर्क साधायचे व स्वतःला अॅप्पल टेक्निकल सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह असल्याचे सांगायचे.
हे कॉलर्स लोकांना सांगायचे की, त्यांचा डिवाइस वा सिस्टममध्ये वायरस, मॅलवेअर वा पोर्नोग्राफिक कंटेट असल्याचे समोर आले आहे. अशात तुम्हाला तातडीने टेक्निकल मदत असल्याची फसवणूक ते अॅप्पल फोन वापरकर्त्यांना सांगायचे.

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या १७४ प्रवाशांचे विमान हायजॅक झाल्याची भीती; वैमानिकांच्या वादाने उडाला गोंधळ

गिफ्ट कार्डचेही आमिष

ते पीडितांना कथित टेक्निकल समस्या ठिक करण्याच्या बहाण्याने गिफ्ट कार्ड विकत घेण्यासाठी समजवायचे. त्यानंतर हे कॉलर्स समोरील व्यक्तीकडे असलेल्या गिफ्ट कार्डच्या डिटेल्स वा कोड मिळवायचे आणि ते आपल्या टिमच्या इतर लोकांकडे पाठवायचे. जप्त करण्यात आलेल्या सुरुवातीच्या तपासात पोलिसांना आयबीएम, अल्ट्राव्यूअर आणि एनीडेस्कसारख्या सॉफ्टवेअर इन्स्टॉल मिळालेत. त्यासोबतच अमेरिकन क्रमांकाची कॉल हिस्ट्री ही पोलिसांच्या हाती लागली आहे.
पोलिसांनी सांगितले की, या ऑपरेशन दरम्यान पाच लॅपटॉप, 12 मोबाइल फोन, 2 राउटर, 6 हेडफोन, 10 क्रेडिट/डेबिट कार्ड, 5 चेक बूक आणि एक ऑडी ए 3 35 टीडीआय कार जप्त करण्यात आली आहे. आरोपींची ओळख अरुण (29), सलीम (28)च्या रुपात झाली असून हे दोघेही काकरोलाचे राहणारे आहेत. तसेच काकरोलाच्याच निखिल (30), पितमपुराच्या मोंटू सिंह (34), किशनगडच्या तिरहुचू (26), उत्तमनगरच्या करण (28) आणि सागपुरच्या विशाल (29) यांचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे.

पोलीस म्हणाले की, या मोठ्या नेटवर्कचा शोध घेणे, टोल फ्री क्रमांकाच्या सोर्सचा पत्ता लावणे, संपर्क करण्यात आलेल्या लोकांची ओळख पटवणे, गिफ्ट कार्डच्या ट्रान्झॅक्शनचा तपास करणे, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करणे आणि पैशांच्या देवाण-घेवाणाबाबत माहिती मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Web Title: Fake call center targeting american citizens busted1344714

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Arrested
  • Cyber Fraud
  • delhi

संबंधित बातम्या

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला
1

Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका; जामीन अर्ज फेटाळला

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
2

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
3

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.