Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच, जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?

गेली अनेक दिवसांपासून हा गावाचा रस्ता बंद आहे. याची तक्रार केल्यानंतर त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट प्रशासनातील अधिकाऱ्यानी गावकऱ्यांनाच सुनावले असे गावकऱ्यांनी सांगितले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 19, 2024 | 01:37 PM
अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार; कारणही तसंच, जाणून घ्या नेमकं झालं तरी काय?
Follow Us
Follow Us:

लोकसभा निवडणूक 2024 : लोकसभा निवडणुकीचा पहिलाच टप्पा आजपासून सुरु झाला आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरु आहे. देशामधील १०२ मतदार संघ मोठ्या उत्साहामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशच्या पीलीभीत आणि कैराना लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एका गावाने मतदानावर बहिष्कार घातला आहे. पीलीभीत मतदारसंघातील बकसपुर गावातील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि पोलीस अधिकारी गावात आले. त्यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. गावातील एका जुन्या रहदारीच्या रस्त्याला प्रशासनाने बंद केल्यामुळे बकसपुर गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अरेरावी केल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला. बकसपुर गावातील रस्ता अनेक दशकांपासून ऑफिसर्स कॉलनीमधून जाणारा रस्ता रहदारीसाठी ते वापरत होते. परंतु गेली अनेक दिवसांपासून हा गावाचा रस्ता बंद आहे. याची तक्रार केल्यानंतर त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट प्रशासनातील अधिकाऱ्यानी गावकऱ्यांनाच सुनावले असे गावकऱ्यांनी सांगितले.

बकसपुर गावातील गावकऱ्यांनी हाच राग धरून आज मतदानाच्या दिवशी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला. प्रशासनाने अखेर पायवाट म्हणून रस्ता वापरण्याची परवानगी दिली, मात्र गावकरी शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकलने प्रवास करण्याचीही मागणी लावून धरली आहे. त्याचबरोबर कैराना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या एका गावानेही अशाचप्रकारे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. कैरानाच्या रसूलपुर गुजरान या गावातील लोकांनी सांगितले की, त्यांच्या गावाने २०१९ साली ९५ टक्के मतदान केले होते. तरीसुद्धा तेथील गावकऱ्यांवर खोट्या केसेस टाकण्यात आलेल्या आहेत. असे असून सुद्धा प्रशासनाने गावाकडे वाकून सुद्धा पहिले नाही असे आरोप गावातील लोकांनी केले आहेत.

Web Title: The entire village boycotted the polls the reason is the same know what actually happened loksabha elections maharashatra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2024 | 01:37 PM

Topics:  

  • Government of India
  • Loksabha Elections
  • loksabha elections 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
1

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
2

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
3

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
4

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.