Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसचा ‘तो’ निर्णय केंद्र सरकारकडून रद्द ; आता RSS च्या कार्यक्रमात दिसणार सरकारी कर्मचारी

आता सरकारी कर्मचारीही आरएसएसच्या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. केंद्राने 1966 मध्ये घातलेली बंदी उठवली आहे. यावर काँग्रेसने तिखट भाष्य केले आहे. आता नोकरशाही चड्डीतही येऊ शकतेस अशी घणाघाती टीकाही केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 22, 2024 | 04:14 PM
काँग्रेसचा ‘तो’ निर्णय केंद्र सरकारकडून रद्द ; आता RSS च्या कार्यक्रमात दिसणार सरकारी कर्मचारी
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आरएसएसच्या कार्यक्रमांना सरकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यावरील बंदी सरकारने हटवली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार आहे. ही बंदी तत्कालीन काँग्रेस सरकारने 1966 मध्ये लागू केली होती. आता 58 वर्षांनंतर ती रद्द करण्यात आली आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने एक आदेश जारी करण्यात आला असून त्यात सरकारी कर्मचाऱ्यांना  आरएसएस’च्या कार्यक्रमात सहभागी होण्यावर घाललेली बंदी हटवण्यात आली आहे. “या आदेशानुसार,  ‘पुनरावलोकनानंतर 30 नोव्हेंबर 1966, 25 जुलै 1970 आणि 28 ऑक्टोबर 1980 रोजी जारी केलेल्या सरकारी आदेशांमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

भारतीय जनता पक्षाचे आयटीसेलचे हेड अमित मालवीय यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “1966 मध्ये, म्हणजे 58 वर्षांपूर्वी जारी केलेला असंवैधानिक आदेश, ज्यामध्ये RSS च्या कार्यात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. तो मोदी सरकारने मागे घेतला आहे.  हा आदेश पहिल्यांदाच पारित व्हायला नको होता.”  असे ट्विट मालवीय यांनी केले आहे.

 काँग्रेसचा ‘या’ निर्णयाला विरोध

केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने विरोध केला आहे. रविवारी, 21 जुलै रोजी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक पोस्ट लिहीत, या निर्णयाचा निषेध केला आहे. “फेब्रुवारी 1948 मध्ये गांधीजींच्या हत्येनंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी घातली होती. यानंतर चांगल्या वर्तनाचे आश्वासन दिल्यानंतर बंदी हटवण्यात आली. त्यानंतरही आरएसएसने नागपुरात कधीही तिरंगा फडकवला नाही. 1966 मध्ये आरएसएसच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती आणि तो योग्य निर्णय होता…’

तसेच, “4 जून 2024 नंतर पंतप्रधान आणि आरएसएसमधील संबंध बिघडले आहेत. 58 वर्षे जुनी बंदी 9 जुलै 2024 रोजी उठवण्यात आली, जी अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातही लागू होती. माझा विश्वास आहे की नोकरशाही आता ‘चड्डी’तही येऊ शकते.”अशी घणाघाती टीकाही जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.

दरम्यान, 1966 आणि 1970 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास मनाई करणारे आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर 1977 मध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर हे आदेश रद्द करण्यात आले, परंतु 1980 मध्ये इंदिरा गांधी सत्तेवर आल्यावर पुन्हा जुने आदेश लागू करण्यात आले होते.

Web Title: The modi government overturned the congresss decision to ban government employees from attending rss events

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 01:02 PM

Topics:  

  • Congress
  • Former PM Indira Gandhi
  • narendra modi
  • RSS

संबंधित बातम्या

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
1

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
2

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
3

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
4

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.