Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Air India: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Air India Trivandrum to Delhi Flight: तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे एअर इंडियाचे विमान चेन्नईच्या दिशेने वळवण्यात आले. चेन्नई विमानतळावर विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले. या विमानात पाच खासदार उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2025 | 09:36 AM
Air India Flight: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Air India Flight: तिरुवनंतपुरम-दिल्ली एअर इंडिया विमानाचे चेन्नईत इमरजेंसी लँडिंग, क्राँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

Follow Us
Close
Follow Us:

तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाचे रविवार 10 ऑगस्ट रोजी रात्री इमरजेंसी लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले. सर्वात महत्त्वाचे या विमानात क्राँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाड यामुळे विमानाचे इमरजेंसी लँडिंग करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एयरलाइनने देखील माहिती दिली आणि दिलगिरी व्यक्त केली आहे.

ChatGPT 5 vs ChatGPT 4: रीजनिंग, आउटपुट आणि परफॉर्मंसच्या बाबतीत कोण अधिक पावरफुल? जाणून घ्या सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक चेन्नईच्या दिशेने वळवण्यात आले. जेव्हा क्रू ला खराब हवामान आणि विमानातील तांत्रिक बिघाड याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. एयरलाइनने पुष्टि केली आहे, फ्लाईट क्रमांक A12455 चेन्नई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे आणि विमानाची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या विमानात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

एयर इंडियाच्या प्रवक्त्याने काय म्हटलं?

या संपूर्ण घटनेबाबत एयर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे की, या घटनेबाबत आणि प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल आम्हाला अत्यंत वाईट वाटत आहे. चेन्नईतील आमचे सहकारी प्रवाशांना मदत करत आहेत आणि प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. या विमानात अनेक खासदार देखील उपस्थित होते.

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी या घटनेबाबत त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान AI 2455, ज्यामध्ये आज माझ्यासह अनेक खासदार आणि शेकडो प्रवासी प्रवास करत होते. या विमानाचे इमरजेंसी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे उड्डाणानंतर काही वेळातच, आम्हाला अभूतपूर्व अशांततेचा सामना करावा लागला.

Air India flight AI 2455 from Trivandrum to Delhi – carrying myself, several MPs, and hundreds of passengers – came frighteningly close to tragedy today.

What began as a delayed departure turned into a harrowing journey. Shortly after take-off, we were hit by unprecedented…

— K C Venugopal (@kcvenugopalmp) August 10, 2025

वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे, उड्डान झाल्यानंतर एका तासाने कॅप्टनने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा केली आणि त्यानंतर विमान चेन्नईच्या दिशेने वळवण्यात आले. सुमारे, 2 तास विमान लँड करण्याच्या आदेशाची वाट पाहत होतो. त्याच धावपट्टीवर आणखी एक विमान असल्याने विमानाला 2 तास हवेतच गोल फिरावे लागल्याचे सांगण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे कॅप्टनने ताबडतोब थांबण्याचा निर्णय घेतल्याने विमानातील सर्व लोकांचे प्राण वाचले. दुसऱ्या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. कॅप्टनचे कौशल्य आणि आमच्या नशिबामुळे आम्ही आज वाचलो, परंतु प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून राहू शकत नाही. मी डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला या घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आवाहन करतो, जबाबदारी निश्चित करतो.

भारत लवकरच अमेरिकेला टाकणार मागे! ChatGPT-5 च्या लाँचिंगवेळी सॅम अल्टमॅनने सांगितलं असं काही… सर्वांचेच उडाले होश

वृत्तसंस्था आयएएनएसनुसार, एअर इंडियाच्या या विमानात केरळचे खासदार आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह यूडीएफचे संयोजक अदूर प्रकाश, काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सुरेश, के. राधाकृष्णन आणि तामिळनाडूचे खासदार रॉबर्ट ब्रूस हे होते.

Web Title: Thiruvananthapuram delhi air india flight emergency landing airline responds know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • air india
  • Congress
  • delhi

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.