Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार; जम्मूमध्ये भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, आसाममध्ये तर…

जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे डोंगरावरून एक मोठा दगड कोसळल्याने एका जोडप्याचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते बंद झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 23, 2026 | 07:29 AM
देशभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार; जम्मूमध्ये भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, आसाममध्ये तर...

देशभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार; जम्मूमध्ये भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, आसाममध्ये तर...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाने देशभरात हाहा:कार उडाला आहे. आसाममध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या 24 तासांत आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसात एक ट्रक नाल्यात घसरल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला.

जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे डोंगरावरून एक मोठा दगड कोसळल्याने एका जोडप्याचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते बंद झाले आहेत. वैष्णो देवी आणि केदारनाथ यात्राही थांबवण्यात आल्या आहेत. आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. राज्यात आलेल्या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत शिवसागरमध्ये १३, चराईदेवमध्ये पाच, गोलाघाटमध्ये दोन आणि जोरहाटमध्ये एका मृत्यूचा समावेश आहे.

राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ५.६४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ८७२ गावे पाण्याखाली गेली असून, २४००० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्कर तैनात करण्यात आले आहे.

आसाममध्ये ६० वर्षांत पहिल्यांदाच असा पूर

राज्याचे संसदीय कामकाज मंत्री पीयूष हजारिका यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, पुरामुळे राज्यात प्रचंड विध्वंस झाला असून लाखो लोक प्रभावित होत आहेत.

सिक्कीममधील बोगद्यातून आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर

सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या तीस्ता फेज-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेनंतर, बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बोगद्यात आणखी पाच मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथके ते बाहेर काढण्याचे काम करत आहेत.

मुसोरी-देहरादून रस्ता रात्री पुन्हा बंद

उत्तराखंडमध्ये दिवसा झालेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेला मुसोरी-देहरादून मुख्य रस्ता पुन्हा सुरू केल्यानंतर, रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत केवळ अत्यावश्यक वाहनांनाच रस्त्यावर ये-जा करण्याची परवानगी आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ दरड कोसळल्याने केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.

Jawali Landslide News : जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड ! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

Web Title: Torrential rains wreak havoc across the country road traffic disrupted by landslides in jammu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 07:21 AM

Topics:  

  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
1

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?
2

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
3

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…
4

देशभरात सप्टेंबरमध्ये 91 टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज; ऑगस्ट गेला कोरडाच, राज्यात तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.