Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात उन्हाचा कडाका कायम; दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

पुणे शहरात सोमवारी किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर वाढलेला उकाडा आणि कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 11:34 AM
पुण्यात उन्हाचा कडाका कायम; दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

पुण्यात उन्हाचा कडाका कायम; दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • उन्हाच्या कडाक्याने पुणेकर हैराण
  • कोल्हापुरातही झाला होता पाऊस
  • पुण्यात उन्हाचा कडाका कायम
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना सोमवारी (ता. १९) सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. शहर आणि परिसरात दिवसभर काहीसे ढगाळ वातावरण असले तरी उन्हाचा चटका कायम होता. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र, पुण्यात उन्हाचा कडाका कायम असल्याचे दिसून येत आहे.

पुणे शहरात सोमवारी किमान तापमान २२.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर वाढलेला उकाडा आणि कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. दरम्यान, मंगळवारी (ता. २०) शहराच्या कमाल तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसून, किमान तापमानात किंचित घट होऊन ते सुमारे २२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ते आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर काही दिवसांपूर्वीच काहीसा दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील काही भागात पाऊस बरसला. नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांगलीच्या कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

कोल्हापुरातही झाला पाऊस

कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळाल होते. सातपुड्‌यातही पावसाने हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, कोंडगाव आणि राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशीत पाऊस झाला. मिरज पूर्व, तासगाव, कवठेमहांकाळ आणि शिराळ्या तालुक्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाण्याअभावी रखडलेल्या रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने आधार मिळाला असून, शाळू, ज्वारीच्या पेरणीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान ! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Web Title: Pune residents get relief from rain after intense heat nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • Climate Change
  • Weather Update

संबंधित बातम्या

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम
1

Mumbai News: अस्वस्थतेचे छुपे कारण आर्द्रता; शहरात उकाडा कायम! आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांचा थेट परिणाम

Chocolate Crisis :चॉकलेटप्रेमींना महागाईचा झटका! कोकोच्या किमती तिप्पट होण्यामागे उष्णतेच्या वादळाचा हात
2

Chocolate Crisis :चॉकलेटप्रेमींना महागाईचा झटका! कोकोच्या किमती तिप्पट होण्यामागे उष्णतेच्या वादळाचा हात

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट
3

यंदा नेहमीपेक्षा कमी थंडी जाणवणार; फेब्रुवारीपासूनच सुरू होणार उन्हाळा तर जलस्रोतांसमोर मोठं संकट

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त
4

COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.