Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG टंचाईचे संकट टळणार! होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना; पाहा किती टन साठा येणार?

भारताचे 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. ही जहाजे पुढील दोन दिवसांत भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 23, 2026 | 09:36 PM
होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना (Photo Credit- X)

होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • LPG टंचाईचे संकट टळणार!
  • होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून २ गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना
  • पाहा किती टन साठा येणार?
मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीत (Hormuz Strait) अडकलेल्या भारतीय जहाजांच्या सुटकेला आता वेग आला आहे. भारताचे ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. या दोन्ही जहाजांवर मिळून 92 हजार टन एलपीजी साठा असून, ही जहाजे पुढील दोन दिवसांत भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

सुरक्षित मार्गक्रमण आणि तांत्रिक पडताळणी

शिप ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, ही दोन्ही जहाजे इराणच्या लारक आणि किश्म बेटांच्या दरम्यान असलेल्या खाडीतून मार्गक्रमण करत आहेत. आपली ओळख स्पष्ट करण्यासाठी आणि इराणी नौदलाच्या तपासणी प्रक्रियेतून तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात आला. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतून भारतापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बुधवारपर्यंत हा साठा भारतात दाखल होईल.

92 हजार टन गॅसचा मोठा आधार

या दोन जहाजांमधील 92,000 टन एलपीजी हा भारताच्या साधारणतः एक दिवसाच्या घरगुती गॅस वापराच्या गरजेइतका आहे. यापूर्वी ‘एमटी शिवालिक’ आणि ‘एमटी नंदा देवी’ ही जहाजे 92,712 टन एलपीजी घेऊन गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरात आधीच दाखल झाली आहेत. युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हे टँकर्स अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

Middle East War: ‘तेलाचा साठा पुरेसा आहे, मात्र LPG चा पुरवठा…’; मध्य-पूर्वेतील संघर्षाबाबत क्रेंद सरकारचे मोठे विधान

अजूनही 22 जहाजे युद्धाच्या छायेत

युद्ध सुरू झाले तेव्हा होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताची एकूण 28 जहाजे अडकली होती. त्यापैकी 4 जहाजे पूर्व भागात, तर 24 जहाजे पश्चिम भागात होती. आतापर्यंत काही जहाजे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अद्याप 22 जहाजे आणि 600 भारतीय नाविक पश्चिम भागात अडकलेले आहेत. यामध्ये खालील जहाजांचा समावेश आहे:

  • 7 एलपीजी कॅरिअर (LPG Carriers)
  • 1 एलएनजी टँकर (LNG Tanker)
  • 4 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर (Crude Oil Tankers)
  • काही कंटेनर आणि बल्क कॅरिअर जहाजे.

इराणकडून कडक तपासणी आणि सुरक्षा

इराण सरकार सध्या या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची सखोल पडताळणी करत आहे. जहाजाची मालकी, त्यावरील माल आणि अमेरिकेशी असलेला संबंध या गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. अडकलेल्या जहाजांवर सध्या अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, केंद्र सरकार सर्व 600 खलाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहे.

भारतासाठी ‘होर्मुज’ जलमार्गाचे महत्त्व

भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग अत्यंत कळीचा आहे. भारत आपल्या गरजेच्या 88% कच्चे तेल, 50% नैसर्गिक वायू आणि 60% एलपीजी आयात करतो. यातील बहुतांश पुरवठा होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे या मार्गावर परिणाम झाल्यास देशांतर्गत इंधन दरवाढ आणि टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते, म्हणूनच या जहाजांची सुरक्षित सुटका होणे भारतासाठी अनिवार्य आहे.

LPG वजनात बदल: मासिक खर्चाचे गणित कोलमडणार? १० किलो गॅस सिलेंडरचे पूर्ण विश्लेषण

Web Title: Two gas tankers cross the strait of hormuz and head towards india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • LPG Gas
  • Nation News

संबंधित बातम्या

LPG New Rules: आता Booking ची पद्धतही बदलली? ‘या’ नियमांशिवाय एलपीजी गॅस Cylinder ची डिलिव्हरी होणार नाही
1

LPG New Rules: आता Booking ची पद्धतही बदलली? ‘या’ नियमांशिवाय एलपीजी गॅस Cylinder ची डिलिव्हरी होणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.