Eport On India : भारताची अर्थव्यवस्था आता चांगल्या सुस्थितीत असल्याचे मत संयुक्त राष्ट्रानेसुद्धा व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगली देशांतर्गत मागणीमुळे भारताचा विकास दर 2024 मध्ये 6.2 टक्के असेल असा अंदाज आहे. WESP 2024 अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 2024 मध्ये 5.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
जगातील अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान
संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगली देशांतर्गत मागणीमुळे भारताचा विकास दर 2024 मध्ये 6.2 टक्के असेल असा अंदाज आहे. WESP 2024 अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 2024 मध्ये 5.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. जगातील अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
जीडीपी 6.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा
उत्पादन आणि सेवा क्षेत्रात चांगली देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, 2023 च्या तुलनेत त्यात थोडीशी घट होणार आहे. अहवालानुसार, 2025 मध्ये भारताचा जीडीपी 6.6 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.






