धुळीचा मारा झाल्यामुळे श्वसनाचे गंभीर त्रास
रिक्षाचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे धाव घेतली असता, संबंधित रस्ता एमएसआरडीसीच्या अखत्यारीत येतो, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याऱ्यांशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी संपर्क साधला असता केवळ चार-पाच कर्मचारी पाठवून दिखावा करण्यात आला. फोटो काढले आणि अवघ्या काही मिनिटांत झाडू मारल्याचा आव आणत घटनास्थळ सोडले. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी अक्षरश: केराच्या टोपलीत फेकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या रिक्षाचालकांना दिवसभर धुळीचा मारा सहन करावा लागत असून, अनेकांना श्वसनाचे गंभीर त्रास सुरू झाले आहेत.
चार मंत्री आणि दोन खासदार असून काय कामाचे?
एकूणच, वाईतील हा रस्ता सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असून, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या गंभीर परिणामांना प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. सातारा जिल्ह्याला चार मंत्री दोन खासदार असून सुद्धा सातारा जिल्ह्याचा विकास साधला जात असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे आपल्या पक्षाचे नेते व पद मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या मंत्र्यांनी नागरिकांना होणाऱ्या वेदनांची थोडी तरी जाण ठेवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांव्यातून होत आहे.






