भारतीय उच्चायुक्तांची रहमानशी भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याच संदभांत, बांगलादेश(Bangladesh)चे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान आपल्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर भारतात दाखल झाले, जिथे त्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा देण्यावर चर्चा केली. या दौऱ्यादरम्यान, रहमान यांनी जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ढाक्यातून जारी केलेल्या निवेदनानुसार, बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुझमान खान कमल यांना बांगलादेशात परत पाठवण्याच्या विनंतीचा पुनरुच्चार केला.
बैठकीदरम्यान, रहमान यांनी असेही सांगितले की त्यांचे सरकार ‘बांग्लादेश फर्स्ट’ धोरणाचा पाठपुरावा करेल आणि परस्पर विश्वास, आदर आणि फायद्याच्या आधारावर परराष्ट्र धोरण राबवेल, संरक्षण संबंध अधिक दृढ करणेः एका महत्त्वपर्ण बांग्लादेशमधील घडामोडीत, भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांनी पंतप्रधान तारिक रहमान यांचे संरक्षण सल्लागार, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) ए. के. एम. शमशुल इस्लाम यांची भेट घेतली. दोन्ही बाजूनी संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि लष्करी संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. प्रणय वर्मा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळाने ढाका छावणीतील सशस्त्र दल विभागात पंतप्रधानांच्या संरक्षण सल्लागारांची भेट घेतली. बैठकीदरम्यान, भारतीय उच्चायुक्तांनी भारत-बांग्लादेश संबंधांच्या निरंतर विकासाच्या महत्त्वावर
या बैठकीपूर्वी, वर्मा यांनी बागलादेशचे पतप्रधान सारिक रहमान यांची भेट घेतली. भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितले की, बैठकीदरम्यान वर्मा आणि रहमान यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. यापूर्वी, रहमान यांनी दिल्लीसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याचा आपला मानस व्यक्त केला होता. ते म्हणाले की, बांगलादेश भारतासोबतच्या आपल्या संबंधांना खूप महत्व देतो. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांच्या दिल्ली दौ-याच्या एका दिवस आधी वर्मा यांची रहमान यांच्यासोबत भेट झाली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






