गुजरातमधून (Gujrat) एक मोठी बातमी समोर येत आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळून मोठी दुर्घटना (Under Construction Bridge Collapse) घडली आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे ओव्हरब्रिजचा कोसळला. या दुर्घटनेत एकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही लोकं अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या बचाव पथक दाखल झालं आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
[read_also content=”गाझामधे पालक मुलांच्या शरीरावर करत आहेत टॅटू, इस्रायली हल्ल्यात मारल्या गेल्यास ओळखता यावी म्हणून धडपड! https://www.navarashtra.com/world/parents-in-israel-making-tattoo-to-their-children-body-to-identify-if-the-killed-in-attack-nrps-473261.html”]
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पालनपूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळला. या अपघातात एका रिक्षाचालकाला आपला जीव गमवावा लागला. ही संपूर्ण घटना सिसिीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
पालनपूर येथील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील रेल्वे ओव्हरब्रिजचा गर्डर कोसळल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ही दुर्घटना अत्यंत गांभीर्याने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघात कसा घडला, याचं कारण शोधण्यासाठी राज्य सरकारच्या रस्ते बांधकाम विभागाचे गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक अभियंता, डिझाईन सर्कलचे अधीक्षक अभियंता आणि GERI चे अधीक्षक अभियंता यांना तातडीने पालनपूर गाठण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अधीक्षक अभियंत्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची अधिक माहिती समोर येईल.






