Satara Education: शिक्षण विभागात खळबळ! 'माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाचे प्रकरण आता न्यायालयात
Satara Politics: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्रमांक तीनच्या जिल्हास्तरीय मूल्यमापन प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार आणि दुजाभाव झाल्याचा आरोप केला आहे. या विरोधात म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी प्राथमिक शाळेचे संस्थापक विश्वंभर बाबर यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने ही रिट याचिका (याचिका क्रमांक HCB M 07003623) दाखल करून घेतली असून, यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
सन २०२५-२६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांतून खाजगी व्यवस्थापन विभागातील प्रत्येकी एक शाळा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडण्यात आली होती. जिल्हास्तरीय प्रथम तीन क्रमांक निवडताना पुरावे न पाहता गुणदान करण्यात आले आणि पात्र शाळांवर अन्याय करून विशिष्ट शाळांना झुकते माप देण्यात आले, असा गंभीर आरोप कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी केला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे यासंदर्भात तक्रार करूनही त्यांनी या गैरव्यवहाराला पाठीशी घातल्याची खात्री पटल्याने अखेर न्यायालयात दाद मागण्यात आल्याचे बाबर यांनी सांगितले.
विश्वंभर बाबर यांनी दाखल केलेली ही याचिका ३१ मार्च २०२६ रोजी नोंदणी क्रमांक १४५० नुसार कोल्हापूर उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारली आहे. मूल्यमापनातील त्रुटी आणि पुराव्यांकडे झालेले दुर्लक्ष यावर आता न्यायालयात सविस्तर सुनावणी होणार असून, या स्पर्धेच्या निकालावर आता टांगती तलवार निर्माण झाली आहे. या कायदेशीर लढाईमुळे ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिक्षण विभागाच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सदरची ही याचिका कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार व माननीय प्रवीण पाटील यांच्या खंडपीठापुढे चालणार आहे. सातारा जिल्हा परिषद स्तरावर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात 11 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या या 11 शाळेचे मूल्यमापन एकाच पथकाने करणे ऐवजी दोन भिन्न पथकाने केल्याने गुणदानात मोठी तपावत झाल्याचा आरोप आहे.खाजगी व्यवस्थापन प्रवर्गातील जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या अनुक्रमे तीन शाळा विशेष म्हणजे एकाच पथकाने तपासणी केलेल्या गटातील आहेत.पथकातील तज्ञ अधिकाऱ्याची गैरहजेरी व गुणदान करताना पुरावा न पाहता केलेले शंकास्पद स्वरूपातील गुणदान इत्यादी बाबत याचिका कर्त्याचा आरोप आहे.
सदरची ही याचिका कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार व माननीय प्रवीण पाटील यांच्या खंडपीठापुढे चालणार आहे. सातारा जिल्हा परिषद स्तरावर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमात 11 खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी झाल्या होत्या या 11 शाळेचे मूल्यमापन एकाच पथकाने करणे ऐवजी दोन भिन्न पथकाने केल्याने गुणदानात मोठी तफावत झाल्याचा आरोप आहे.खाजगी व्यवस्थापन प्रवर्गातील जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेल्या अनुक्रमे तीन शाळा विशेष म्हणजे एकाच पथकाने तपासणी केलेल्या गटातील आहेत.पथकातील तज्ञ अधिकाऱ्याची गैरहजेरी व गुणदान करताना पुरावा न पाहता केलेले शंकास्पद स्वरूपातील गुणदान इत्यादी बाबत याचिका कर्त्याचा आरोप आहे.
संशयास्पद हालचालींवर मुंबई महानगरपालिका ठेवणार बारीक लक्ष! शहरात बसवले जाणार
माहितीच्या अधिकारात मागणी करून ही शाळा तपासणी गुणदान तक्ता व गुणदानाचे पुरावे देण्यास सातारा जिल्हा परिषदेने टाळाटाळ केल्याने याबरोबरच जिल्हास्तरावर फेर मूल्यांकन करण्यास नकार दिल्याने नाईलाजाने विश्वंभर बाबर यांनी याप्रकरणी उच्च न्यायालय कोल्हापूर येथे न्याय मिळण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी शिक्षण सचिव महाराष्ट्र राज्य , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सातारा यांना पार्टी केलेली आहे. सातारा जिल्हा स्तरावरील ही स्पर्धा स्थगित करावी तसेच फेर मूल्यांकन करावे अशी मागणी विश्वंभर बाबर यांनी केलेली आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट सूर्यजीत चव्हाण व ॲडव्होकेट इंद्रजीत बाबर काम करीत असल्याची माहिती संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर यांनी दिली.






