Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगदीप धनखड यांनी कुणाच्या दबावाखाली राजीनामा दिला? खासदाराच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी विरोधकांकडून सुरू होती, मात्र शरद पवार यांनी याला कडाडून विरोध केला होता.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 24, 2026 | 04:45 PM
Sanjay Raut,Unlikely Paradise Book, Jagdeep Dhankhar,

Sanjay Raut,Unlikely Paradise Book, Jagdeep Dhankhar,

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांच्या ‘अनलाइकली पॅराडाईज’ पुस्तकात धक्कादायक दावे
  • फाईलचा धाक दाखवून तपास यंत्रणांनी धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले
  • ईडीने त्यांच्या कुटुंबावर छापे टाकल्याने २०२५ मध्ये दबावाखाली येऊन त्यांना राजीनामा
Jagdeep Dhankhar Resignation Reason:  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘अनलाइकली पॅराडाईज’ (Unlikely Paradise) या नव्या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. तुरुंगावासाच्या काळात लिहिलेल्या या पुस्तकात राऊत यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेषतः, माजी उपराष्ट्रपतींचा राजीनामा हा स्वेच्छेने नसून तपास यंत्रणांच्या दबावाखाली होता, असा थेट आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे.

Bacchu Kadu Viral Video: मंत्रिपदासाठी भोंदूचा आशीर्वाद? गुवाहाटी रिटर्न बच्चू कडूंचा खरातसोबतचा व्हिडिओ Viral

उपराष्ट्रपतींचा राजीनामा: ईडीच्या फाईलचा धाक?

संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात काही गंभीर दावे केले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या वर्षी (२०२५) दिलेला राजीनामा हा केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे नव्हता. राऊत यांच्या मते, धनखड यांची स्वतंत्र राजकीय कार्यपद्धती केंद्र सरकारला खटकत होती, असं संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

पुस्तकातील दाव्यानुसार, धनखड दाम्पत्याने जयपूरमधील आपले घर विकून पैसे परदेशात पाठवल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या माहितीच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एक फाईल तयार केली होती. याच फाईलचा धाक दाखवून तपास यंत्रणांनी धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडले, ज्यानंतर त्यांनी २१ जुलै रोजी आपल्या पदाचा त्याग केला, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.

निवडणूक आयोगावर दबाव आणि अशोक लवासा यांचा किस्सा

माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या राजीनाम्यामागील ‘पडद्यामागची गोष्ट’ही राऊत यांनी मांडली आहे. ‘लवासा यांनी निवडणूक आचारसंहितेच्या आठ कथित उल्लंघनांसाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या निष्पक्ष भूमिकेमुळे ईडीने त्यांच्या कुटुंबावर छापे टाकले आणि त्यांना सतत चौकशीच्या फेऱ्यात अडकवले. अखेरीस, २०२५ मध्ये दबावाखाली येऊन त्यांना राजीनामा द्यावा लागला.

Satara Mahayuti Conflict: साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे संबंध

गुजरात दंगलींनंतरच्या राजकीय परिस्थितीचा संदर्भ देताना राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवण्याची तयारी विरोधकांकडून सुरू होती, मात्र शरद पवार यांनी याला कडाडून विरोध केला होता. “राजकीय मतभेदांमुळे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकणे ही चुकीची प्रथा ठरेल,” असा पवारांचा युक्तिवाद होता, असे राऊत यांनी नमूद केले आहे.

तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका कायदेशीर प्रकरणात जामीन मिळवून देण्यात शरद पवार आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.

पुस्तकाची पार्श्वभूमी

संजय राऊत यांनी हे पुस्तक आपल्या तुरुंगवासाच्या काळात लिहिले असून, २०२५ मध्ये त्याची मूळ मराठी आवृत्ती प्रकाशित झाली होती. सोमवारी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले, ज्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर यातील दाव्यांची चर्चा सुरू झाली आहे

 

Web Title: Under whose pressure did jagdeep dhankhar resign shocking revelations in an mps book

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Jagdeep Dhankhar
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
1

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान
2

Sanjay Raut vs BJP: ‘ED आणि CBI आमच्या ताब्यात द्या, १० मिनिटांत भाजपचे १० तुकडे करू” संजय राऊतांचे थेट आव्हान

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा
3

‘शिर्डीचा खासदार एक नंबरचा बदमाश’; साईबाबांची तीनदा शपथ घेतली अन् 100 कोटींना विकला गेला, संजय राऊतांचा भाऊसाहेब वाकचौरेंवर निशाणा

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.