Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UP News : योगी आदित्यनाथ यांचा आणखी एक ‘मास्टरस्ट्रोक’! भदोही जिल्ह्याचे बदलले नाव, आता नुस्ता विकास!

UP News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भदोही जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. आता भदोही जिल्हा ‘संत रविदास नगर भदोही’ या नावाने ओळखला जाणार आहे. या कार्यक्रमात 1,340 कोटी रुपयांहून अधिकच्या 112 विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 08:47 PM
UP CM Yogi adityanath

UP CM Yogi adityanath

Follow Us
Follow Us:
  • भदोही जिल्ह्याचे नाव बदलून ‘संत रविदास नगर भदोही’ करण्यात आल्याची घोषणा.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भदोहीतील कार्यक्रमात केला नामांतराचा ऐलान.
  • 1,340 कोटी रुपयांहून अधिकच्या 112 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन.
 

UP News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक मारला आहे. यंदा उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्ह्याचे नाव बदलून संत रविदास नगर भदोही असे करत विकासाचा आणखी एक उच्चांक गाठला आहे. भदोही येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली.

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, आता भदोही जिल्ह्याला ‘संत रविदास नगर भदोही’ या नावाने ओळखले जाईल. संत रविदास यांच्या नावाला जिल्ह्याशी जोडण्याचा निर्णय याआधीच जाहीर करण्यात आला होता. याआधीच खासदार रवी किशन यांनी उत्तर प्रदेशची तुलना स्पेनशी करून राज्याच्या विकासाबद्दल मोठे वक्तव्य केले होते. आता मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही जिल्ह्याचे नामकरण करत रवीकिशन यांचे शब्द खरे ठरवले आहेत.

संत रविदास यांच्या नावावरून जिल्ह्याचे नामकरण

योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले की, “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सरकारने भदोही जिल्ह्याचे नाव संत रविदास यांच्या नावाने ओळखले जाईल, असे म्हटले होते. संत रविदास हे मध्ययुगीन संत असून त्यांनी आध्यात्मिक भक्तीच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे काम केले,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

Yogi Adityanath : युपीतील नागरिकांच्या स्थलांतरणाबाबत आदित्यनाथांचं मोठे विधान; म्हणाले, आता आपल्या मातीतच कौशल्य दाखवण्याची संधी

भदोही हा जिल्हा देशातील प्रसिद्ध कार्पेट उद्योगासाठी ओळखला जातो. भदोहीला ‘Carpet City’ म्हणून संबोधले जाते आणि येथे हाताने विणलेल्या कार्पेट उद्योगाचे मोठे केंद्र आहे.

1,340 कोटींच्या 112 प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

भदोहीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1,340 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 112 विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या विकासकामांबरोबरच जिल्ह्याच्या नामांतराची घोषणा करण्यात आली.

यामुळे भदोहीच्या नावाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीही जिल्ह्याच्या नावात बदल करण्यात आले होते. उपलब्ध वृत्तांनुसार, 1999 मध्ये ‘संत रविदास नगर भदोही’ हे संयुक्त नाव करण्यात आले होते, तर 2014 मध्ये पुन्हा ‘भदोही’ हे नाव करण्यात आले. आता 2026 मध्ये पुन्हा ‘संत रविदास नगर भदोही’ या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

जिल्ह्यांचे नामकरण म्हणजेच यूपीचा विकास?

योगी आदित्यनाथ हे नाव बदलण्याच्या भूमिकेमुळे देशभरात प्रसिद्ध आहेत. राज्यातील लोक रोजगाराच्या शोधात देशभरात भटकत असताना आदित्यनाथ यांनी नाव बदल कारण्याचा तगादा लावला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करताना दिसून येत आहे. असे असले तरीही, उत्तर प्रदेशमधील विकास प्रकल्पदेखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

योगी सरकारच्या काळातील प्रमुख नामांतरं

  • इलाहाबाद – प्रयागराज
  • फैजाबाद – अयोध्या
  • मुगलसराय – पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर
  • मुगलसराय रेल्वे स्टेशन – पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन
  • मुघल म्युझियम, आग्रा – छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम
  • अकबरपूर बस स्टँड – श्रवण धाम बस स्टँड
  • जालालाबाद – परशुरामपुरी
  • भदोही – संत रविदास नगर भदोही

Web Title: Up news bhadohi district renamed sant ravidas nagar bhadohi yogi adityanath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • up news
  • Uttar Pradesh
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
1

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
2

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
3

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.