विंचू (Scorpion) फक्त जरी घेतलं तरी भीतामुळे अनेकांची घाबरगुंडी उडते. विंचू चावल्यानंतर माणसाचा जीव वाचण्याची शक्यता फार कमी असते. पण तुम्हाला माहिती आहे का? जीव घेणाऱ्या विंचू कुणाच जीव वाचवूही शक्यतो. ऐकण्यास हे जरी विचित्र वाटत असलं तरी ते खरं आहे. या विंचूंमध्ये अशा काही प्रजाती आहेत ज्यांचा विषाचा वापर सौंदर्यप्रसाधने, वेदना निवारक औषधींसाठी केला जातो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) या विंचूच्या विषाची किंमत (Scorpion Poison Price) तब्बल 80 कोटी आहे.
भारतात आढळणाऱ्या प्रत्येक विंचवामध्ये इतके विष नसते की त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, जगात असे अनेत विंचू आहेत ज्यांच्या विषाचा वापर करण्यात येतो. Deathstalker हा जगातील सर्वात धोकदायक विंचू म्हणून ओळखल्या जातो. उत्तर अमेरिका आणि मध्य ईशान्य भागात हा विंचू आढळतो. या धोकादायक विंचवाच्या विषाची किंमत एक गॅलन किंवा सुमारे 4 लिटर विष असेल तर, विषाची किंमत तीन अब्ज रुपयांपर्यंत आहे.
विंचूच विष काढण्याच्या पद्धतीमुळे हे फार महाग असतं. कारण एक विंचू एकावेळी फक्त 2 मिलीग्राम विष काढु शकतो. त्यामुळे 1 गॅलन विष काढण्यासाठी विंचूकडुन 264 लाख वेळा विष काढलं जातं. त्यात विशिष्ट बाब म्हणजे एका विंचू कडुन महिण्याला फक्त एकदाच विष काढु शकतो. त्यांनातर त्यावर प्रक्रिया करुन औषधी आणि ठिकाणी त्याचा वापर करण्यात येतो. त्याचा वाढता वापर पाहता याची किंमत ऐव्हडी जास्त आहे. [blurb content=””]ध
या विंचवाच्या विषात अनेक प्रकारचे न्यूरोटॉक्सिन आढळतात. यापैकी क्लोरोटॉक्सिन कित्येक प्रकराच्या कर्करोगावर फायदेशीर ठरतं. मात्र, दिवसेंदिवस विंचवाच्या विषयाला मिळणारं महत्व पाहता याच्या वापर करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी अनेक देशात याची शेतीही करण्यात येते. विंचवाच विष आणि त्याला आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत आलेलं महत्त्व पाहत येत्या काळात आणखी त्यात भर पडु शकते. 2027 पर्यंत विषावरील प्रतिकारक औषध बनवणाऱ्या औषधांनी (Anti Venom Industry) बाजारपेठेतील उलाढाल 13 हजार कोटीपर्यंतही जाऊ शकते. मात्र, अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर विंचूची शेती केल्याने विंचूच्या काही प्रजाती नष्ट होण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे.






