srh vs kkr live streaming (फोटो- ट्विटर)
आज केकेआर विरुद्ध एसआरएच रंगणार सामना
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच
अभिषेक शर्मा – सुनील नारायण आमनेसामने
Tata IPL 2026 KKR vs SRH Live Toss Updates: ईडन गार्डन्स स्टेडियमवर थोड्याच वेळात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान हा (SRH vs KKR) सामना 7.30 वाजता सुरू होणार आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त असल्याचे पीच रिपोर्टमधून समोर आले आहे. दरम्यान या केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज केकेआर आणि एसआरएचचे संघ आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत.केकेआरला आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना वानखेडे स्टेडियमवर झाला होता तर हैद्राबादच्या संघाला बंगलोरच्या संघाकडून हार पत्करावी लागली. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता. त्यामुळे आज दोन्ही संघ आक्रमक आणि संयमी खेळ करताना पाहायला मिळेल.
केकेआरचा संघाचे पारडे हैद्राबादच्या संघापेक्षा मजबूत दिसून येत आहे. हैदराबादच्या संघाला टॉप ऑर्डरची चिंता सतावत आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत.
KKR चे ‘नारायणास्त्र’ चालणार की SRH चे ओपनर्स धुलाई करणार? काय आहे आजची Playing 11
पीच रिपोर्ट काय सांगतो?
ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इथे फक्त फलंदाजांची ताकद दिसू शकते. टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे निवडतो. या स्टेडियमवर आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळू शकतो.
KKR Vs SRH Pitch Report Live: समोर आली ईडन गार्डन्सची कुंडली; ‘हा’ निर्णय घेतल्यास विजय निश्चित
कसे असणार हवामान?
आज एसआरएच आणि केकेआर यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना होणार आहे. केकेआरचे हे होम ग्राऊंड आहे. दरम्यान या ठिकाणी खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचे समोर येत आहे. दरम्यान आज येथील हवामान देखील साफ आणि मोकळे असण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाहीये. कदाचित उकाडा जास्त असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खेळाडूंना त्रास होऊ शकतो.
केकेआरची संभाव्य टीम: फिन्न ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, अनुकूल रॉय, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, रॉवमन पॉवेल,
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हेनरिक क्लासेन, लियाम लिविंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अनिकेत वर्मा, सलील अरोरा






