Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarakhand Tunnel Accident: चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू; 14 मजुरांची सुखरूप सुटका; मृतक आणि जखमींची नावे समोर

Uttarakhand Tunnel Accident: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी येथे निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या सुरंगेत पाणी आणि मलबा घुसल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 14, 2026 | 11:22 AM
चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू; 14 मजुरांची सुखरूप सुटका; मृतक आणि जखमींची नावे समोर

चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू; 14 मजुरांची सुखरूप सुटका; मृतक आणि जखमींची नावे समोर

Follow Us
Follow Us:
  • पीपलकोटी सुरंग दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू
  • पाण्यासह मलबा सुरंगेत शिरला अन् अनर्थ
  • चमोलीत 7 मजुरांचा मृत्यू, 14 जखमी
Uttarakhand Tunnel Accident: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी (Chamoli tunnel accident) परिसरात गुरुवारी, 13 ऑगस्ट रोजी मोठी दुर्घटना घडली. विष्णुगाड-पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन सुरंगेत अचानक मोठ्या प्रमाणात पाणी आणि मलबा घुसल्याने सुरंगेत काम करणारे मजूर अडकले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 मजूर जखमी झाले आहेत. (Uttarakhand Tunnel Accident)

सुरंगेत नेमकं काय घडलं?

पीपलकोटी परिसरातील THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन सुरंगेत गुरुवारी संध्याकाळी अचानक भूस्खलन झाले. त्यानंतर सुरंगेत मोठ्या प्रमाणावर पाणी आणि मलबा शिरला. त्यामुळे काम करणाऱ्या मजुरांना बाहेर पडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

महागाई भिडली गगनाला; देशाचा किरकोळ महागाई दरही वाढला, आता…

NDRF-SDRFकडून बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच NDRF आणि SDRFच्या पथकांसह स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. सुरंगेत पाणी आणि मलबा असल्याने बचावकार्याला अडथळे निर्माण झाले. सुरंगेत अडकलेल्या कामगारांचा शोध घेण्यासाठी पथके सातत्याने प्रयत्न करत आहेत.

मुख्यमंत्री धामी घटनास्थळी

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला बचावकार्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिमालयीन भागातील भूस्खलन आणि भूगर्भीय अस्थिरतेमुळे अशा बांधकामांमध्ये मोठे धोके निर्माण होतात.

मृत मजुरांची नावे

प्रदीप सिंह पवार – गेंवाल, टिहरी जिल्हा
मुकेश – चमोली
दुर्लभ शर्मा – बिहार
विजय कुमार – झारखंड
जितेंद्र कुमार – झारखंड
लोकेश्वर
भुनेश्वर

14 जखमी मजुरांची नावे

दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांमध्ये सुनील दीवान, हाबिल गुड़िया, निस्तार भिंगरा, विनोद सावना, दीना बैगरा, खेला राम बिसरा, छब्बा सिंह, तिलक राज, चंदन कुमार, अवधेश, नंदलाल, रोहित पांडे, पेन सिंह आणि गोविंद यांचा समावेश आहे. यापैकी गोविंद यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर रोहित पांडे यांना श्रीनगर येथे पुढील उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. इतर जखमींवर गोपेश्वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Web Title: Uttarakhand tunnel accident chamoli pipalkoti 7 workers killed 14 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Accident
  • india
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
1

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
2

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!
3

Gondiya News: मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर; स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण! शेतात केला अंत्यसंस्कार!

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात
4

Gondiya News: लाच घेताना वनपाल अडकला जाळ्यात! एसीबीची पारसटोला येथे धडक कारवाई; दोन वनरक्षकांनाही घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.