Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूर अजूनही शांत होईना; जाळपोळ सुरूच; सुरक्षा दलाचा जमावावर बळाचा वापर, अशी आहे सद्यस्थिती…

ल्या महिनाभरापासून जातीय हिंसाचारात मणिपूर (Manipur Violence) होरपळत असून, गुरूवारीही संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दंगलखोरांची सुरक्षा दलासोबत झटापटही झाली. इम्फाळमधील न्यू चाकोन येथे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला बळाचा (Manipur) वापर करावा लागला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 16, 2023 | 08:45 AM
मणिपूर अजूनही शांत होईना; जाळपोळ सुरूच; सुरक्षा दलाचा जमावावर बळाचा वापर, अशी आहे सद्यस्थिती…
Follow Us
Follow Us:

इम्फाळ : गेल्या महिनाभरापासून जातीय हिंसाचारात मणिपूर (Manipur Violence) होरपळत असून, गुरूवारीही संतप्त जमावाने घरांची जाळपोळ केली तर काही ठिकाणी दंगलखोरांची सुरक्षा दलासोबत झटापटही झाली. इम्फाळमधील न्यू चाकोन येथे जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाला बळाचा (Manipur) वापर करावा लागला. राज्यात हिंसाचार वाढल्यानंतर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी कारवाई तीव्र केली आहे. लष्कराच्या तुकड्यांनी गस्त वाढवली असून, जिथे जिथे नाकेबंदी करण्यात आली होती, तिथे ती हटवण्यात आली आहेत.

हिंसाचाराच्या अलीकडील वाढीनंतर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ऑपरेशनला गती देण्यात येत आहे. एक दिवसापूर्वी राज्यातील खमेनलोक भागातील एका गावात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाले होते, तर 10 जण जखमी झाले होते. बुधवारी पहाटे खामेनलोक भागातील कुकी गावात झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी पुन्हा कारवाई तीव्र केली आहे. एक महिन्यापूर्वी, मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

इंटरनेट बंदीला वाढ

गेल्या महिन्याभरापासून मैतई आणि कुकी समुदायातील वादामुळे मणिपूर राज्यात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट बंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने 20 जून रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत स्थगिती वाढवली आहे. मणिपूरमध्ये अफवा रोखण्यासाठी सरकारने हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंटरनेटवरील बंदी 9 व्यांदा वाढवली आहे. 3 मे रोजी पहिल्यांदा ही बंदी लागू करण्यात आली होती. मणिपूरमधील जनजीवन सध्या विस्कळीत झाले आहे. अनेक संघटनांनी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Violence still exist in manipur and state is not peaceful nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2023 | 08:45 AM

Topics:  

  • india
  • Manipur
  • Manipur Violence
  • Manipur Violence News
  • Violence in Manipur

संबंधित बातम्या

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला
1

Operation ShadowRecruit: नोकरी शोधताय? सावधान! कॅबिनेट सचिवालयाच्या नावाने बनावट भरती; संगणकावर होऊ शकतो सायबर हल्ला

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी
2

Akshay Kumar Acer: लॅपटॉपपासून AC-वॉशिंग मशीनपर्यंत! ‘House of Acer’साठी अक्षय कुमारचा ब्रँडसोबत हातमिळवणी

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर
3

HPCL Renewable Energy: वीजनिर्मितीसोबत जमीन-पाण्याचीही बचत; HPCLचे कृषी-सौर आणि फ्लोटिंग सोलार मॉडेल ठरणार गेमचेंजर

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार
4

दिल्ली-अहमदाबाद-सुरत ते मुंबई-पुणे-गोवा; Amazon India चे रेल्वे नेटवर्क आणखी मजबूत, १४० हून अधिक ट्रेन धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.