मोठी बातमी! मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार; केंद्रीय निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Voter ID Link With Aadhar : मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने (Election commission) मोठा निर्णय घेतला आहे. मतदानकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि घटनेतील तरतुदीनुसार हा बदल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच यासंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने यांदर्भात निवेदन दिलं असून यात, संविधानाच्या कलम ३२६ आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) नुसार मतदान कार्ड आधारशी जोडले जाईल. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला होता.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज निवडणूक आयोगाच्या सदनात निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह केंद्रीय गृह सचिव-सचिव, कायदे विभाग, सचिव एमईआयटीवाय आणि सीईओ यूआयडीएआय आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक पार पडली.
The Election Commission of India, led by CEC Gyanesh Kumar, along with ECs Dr Sukhbir Singh Sandhu and Dr Vivek Joshi, held a meeting with the Union Home Secretary, Secretary Legislative Department, Secretary MeitY and CEO, UIDAI and technical experts of the ECI in Nirvachan… pic.twitter.com/v8sD4ECpb6
— ANI (@ANI) March 18, 2025
निवडणूक आयोग लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम ३२६ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित निर्णयांनुसार मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकत्व असलेल्यांनाच मिळू शकतो, आधार कार्ड केवळ व्यक्तीची ओळख स्थापित करते. त्यामुळे मतदान ओळकपत्र आधारशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. संविधानाच्या कलम ३२६, लोकप्रतिनिधी कायदा, १९५० च्या कलम २३(४), २३(५) आणि २३(६) आणि WP (सिव्हिल) क्रमांक १७७/२०२३ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात येणार आहे. आता UIDAI आणि ECI च्या तांत्रिक तज्ज्ञांसोबत सल्लामसलत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
Election Commission holds high-level meeting on EPIC-Aadhaar linking, emphasizes Constitutional compliance
Read @ANI Story https://t.co/FN0awoHPBO #ECI #EPIC #Aadhaar pic.twitter.com/dKkPm3BvI2
— ANI Digital (@ani_digital) March 18, 2025