Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील अनेक भागांत वातावरणात बदल; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून अंदाज

देशातील अनेक भागांत पुढील दोन दिवसांत ४ ते ७ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील तापमानही काही दिवसांत ३ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 18, 2026 | 07:12 AM
देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल; हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

देशातील अनेक ठिकाणी वातावरणात बदल; हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल दिसून येत आहे. मार्चच्या तीव्र उष्णतेमुळे उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वायव्य भारतातील कमाल तापमान पुढील तीन दिवसांत ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील अनेक भागांत पुढील दोन दिवसांत ४ ते ७ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील तापमानही काही दिवसांत ३ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते. पश्चिम भारतात, विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रातही किंचित घट दिसून येऊ शकते. देशातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामानाने अचानक वळण घेतले आहे. विविध भागांतील सक्रिय पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आणि चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे तापमानातही चढ-उतार होतील.

हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert : आता काय पाऊस ऐकत नाही ! पुढील दोन दिवस नुसता धुमाकूळ अन्…

हवामानातील या मोठ्या बदलामागे पश्चिमी विक्षोभ आणि वाऱ्यांची चक्रीय स्थिती हे मुख्य कारण आहे. पश्चिमी विक्षोभ म्हणजे भूमध्य सागरी प्रदेशात उगम पावणारी आणि उत्तर भारतात पोहोचणारी प्रणाली, ज्यामुळे पाऊस आणि हिमवृष्टी होते. सध्या, ही प्रणाली पंजाबच्या वरच्या वातावरणात सक्रिय आहे. उपोष्णकटिबंधीय पश्चिमी जेट प्रवाह देखील पूर्व भारतावर सक्रिय आहे, ज्यामुळे ढगांची निर्मिती आणि पावसाची तीव्रता वाढत आहे.

हवामान आणखी बदलण्याचा अंदाज

हवामान विभागाच्या मते, १७ मार्चच्या रात्रीपासून वायव्य भारतावर आणखी एक नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे, ज्यामुळे येत्या काही दिवसांत हवामान अधिक अस्थिर होण्याची शक्यता आहे.

पर्वतीय भागात पाऊस आणि बर्फवृष्टी

जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातील पश्चिम हिमालयीन प्रदेश विशेषतः प्रभावित होण्याची शक्यता आहे. उंच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे. यामुळे तापमानात घट होऊ शकते.

Web Title: Weather changes observed in several parts of country meteorological department forecasts heavy rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 07:07 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
1

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
2

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
3

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी
4

‘अर्नब’ चक्रीवादळाचा धोका? ‘या’ दोन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 75 किमीपर्यंत वाऱ्यांची शक्यता; शाळांना सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.