Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Weather : प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नैनीतालमध्ये मागील तीन दिवसांपासून हवामानाचा पारा घसरला आहे. येथे सलग पडलेल्या जोरदार पावसानंतर थंड वारे वाहू लागले असून पर्यटक बाजारातून लोकरीचे कपडे विकत घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 05:03 PM
Weather : उत्तर भारतातील 'या' शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Weather : उत्तर भारतातील 'या' शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Follow Us
Follow Us:
  • नैनीतालमधील वातावरण अचानक बदलले
  • पर्यटकांचा लोकरीचे कपडे घेण्याकडे कल
  • वातावरणाचा अंदाज घेण्याची विभागाची माहिती
सरोवर नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नैनीतालमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसानंतर येथील हवामाना (Weather ) ने अचानक आपले रुप बदलले आहे. येथे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस व त्यामुळे पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे येथील पाराही घसलला आहे.
पावसात अचानक वाढलेल्या थंडीने येथे आलेल्या पर्यटकांच्याही अडचणी वाढवल्या आहेत, त्यामुळे लोकरीचे गरम कपडे शोधण्यासाठी त्यांना आपल्या हॉटेलबाहेर पडावे लागणार आहे. स्थानिकांसह पर्यटकांनी नैनीतालच्या मुख्य बाजारपेठेत लोकरीचे कपडे घेण्यासाठी गर्दी केली आहे.

नैनीतालच्या बाजारांत सध्या जॅकेट, स्वेटर आणि इतर लोकरीचे शरीराला उब देणाऱ्या कपड्यांची खरेदी करताना पर्यटक पाहण्यास मिळत आहेत. दुकानदारांचे म्हणणे आहे की, हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे लोकरीच्या कपड्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली.
महत्त्वाचे म्हणजे, येथे पाऊस कोसळल्यानंतर थंड वारे वाहू लागतात. ज्यामुळे लोकांना घरात किंवा रस्त्यांवर साध्या कपड्यात वावरणे कठिण झाले आहे.

पर्यटकांचा लोकरीचे कपडे खरेदीकडे कल

दिल्लीहून येथे पर्यटनासाठी आलेली गरिमा म्हणाली की, आम्ही येथे आलो तेव्हा सुरुवातीला वातावरण छान होते, पण मागील तीन दिवसांपासून येथे सातत्याने पाऊस पडत असून थंडी वाढली आहे. आम्ही येथे येताना थंडीचे कपडे आणले नव्हते, ज्यामुळे आम्हाला आता बाजारात जाऊन जॅकेट व इतर लोकरीचे कपडे विकत घ्यावे लागत आहेत.
तर मध्यप्रदेशातून आलेला पर्यटक अवनीश म्हणाला की, नैनीतालमध्ये सध्या गारेवारे वाहत आहेत. पावसानंतर येथील थंडी अचानक वाढली. आम्हाला असं काही घडेलं असं वाटलंच नव्हते, त्यामुळे आम्हाला लोकरीचे कपडे विकत घेण्यासाठी बाजार गाठावे लागत आहे.

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

व्यापाऱ्यांचा फायदा

भोटिया मार्केटमधील कपड्याचे दुकानदार दिनेश भोटिया म्हणाले की, नैनीतालमध्ये अगोदरच थंडी सुरू झाली आहे. त्यात मागील तीन दिवसांत पडलेल्या पावसाने येथील तापमानाचा पारा खालावला. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकही साध्या जॅकेटऐवजी मोठे स्वेटर, जॅकेट व इतर उबदार कपड्यांची मागणी करत आहेत. यातून चांगला नफा मिळत आहे.
तसेच येणाऱ्या काळात जर आपण नैनीताल फिरण्याचा प्लान आखत असाल तर येथील वातावरणाबाबत अपडेट राहण्याचे आव्हान हवामान विभागाने पर्यटकांना केले आहे. सततचा पडणारा पाऊस व थंडीकडे पाहता पर्यटकांनी पावसाच्या जॅकेटसह थंडीचे जॅकेटही सोबत बाळगावे असेही सांगण्यात आले आहे.
डोंगराळ भागात पावसादरम्यान तापमान वेगाने खाली येतो. अशात निसर्गरम्य अशा नैनीतालमध्येही तिच परिस्थिती सध्या पाहण्यास येत असून ऑक्टोबर हिटपासून कंटाळलेलेल नागरिक नैनीताल फिरण्याची प्लानिंग नक्की आखू शकतात.

LPU Violence: लव्हली प्रोफेशनल विद्यापीठात राडा; पोलिसांच्या वाहनांना आग, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज

Web Title: Weather north india nanital winter seasion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • imd
  • Market
  • tourism

संबंधित बातम्या

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?
1

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
2

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
3

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
4

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.