राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? सोनमचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
Sonam Raghuvanshi Viral Video: मेघालयातील शिलाँग येथे हनीमून दरम्यान राजा रघुवंशी यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी सोनम रघुवंशी हिला आज (9 जून) उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. राजा आणि सोनम हे मुळचे इंदूरचे रहिवासी होते. लग्नाच्या ९ दिवसांनी ते मेघालय येथे हनिमूनसाठी गेले होते. पण हनिमुनला गेल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पण राजा यांचा मृतदेह डोंगरांच्या पायथ्याशी आढळून आला. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर सात दिवसांनी, सोनमने रात्री उशिरा गाजीपूरहून तिच्या कुटुंबियांना फोन केला होता.
दरम्यान, कुटुंबाला फोन येताच, शिलाँग पोलिसांनी तातडीने कारवाई करत, यूपी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर, गाजीपूर पोलिसांनी तिला गाझीपूरच्या एका ढाब्यातून ताब्यात घेतले. सोनमला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा हळहळू उलगडा होऊ लागला आहे.
Mumbra Train Accident: “ठाकरे बंधू एकत्र येण्यापेक्षा…”; रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचे भाष्य
दरम्यान, सोनम रघुवंशीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनम तिचा पती राजासोबत स्कूटी बुक करण्यासाठी गेल्याचे दिसत आहे. राजा स्कूटरवर बसून त्याची पत्नी सोनमला त्याचे हेल्मेट धरायला बोलावतो, पण सोनम मागे जाऊन तिच्या मोबाईल फोनवर पटकन काहीतरी टाइप करताना दिसत आहे. सोनम कुणालातरी गुप्तपणे मेसेज पाठवत असल्याचे यात दिसून येत आहे, या व्हिडीओनंतर या प्रकरणातील संशय अधिकच वाढत चालला आहे.
राजा रघुवंशी आणि सोनम बेपत्ता झाल्यामुळे या प्रकरणाचे गुड सातत्याने वाढत चालले होते.जवळपास १७ दिवसांपूर्वी शिलाँगमध्ये राजा रघुवंशी यांच्या मृत्यूची बातमी आली होती आणि तेव्हापासून मध्यप्रदेश आणि मेघालय पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. आता, इतक्या दिवसांनंतर, सोनमची अचानक गाजीपूरमध्ये उपस्थिती आणि तिने स्वतः कुटुंबाशी संपर्क साधल्याने तपास यंत्रणांसमोर अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, सोनमच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
निवडणुका निष्पक्ष होणार? खालिदा जिया यांच्या BNP पक्षाचा मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान, शिलाँग ते गाजीपूर हे अंतर सुमारे ११६२ किलोमीटर आहे. या मार्गावर थेट ट्रेन नाही. खाजगी वाहनाने किंवा लिफ्टने सतत प्रवास केला तरी किमान २५ तास लागतात. अशा परिस्थितीत, सोनमने इतके अंतर कापून इतके दिवस पोलिसांना टाळाटाळ का केली, असाही प्रश्न उपस्थित होत असून यातील गुढ आणखी वाढत चालले आहे. त्यामुळे सोनमची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शिलांग के होटल की CCTV फुटेज देखिए –
22 मई को हत्या से पहले राजा रघुवंशी और पत्नी सोनम बाइक से घूमने के लिए निकल रहे थे। तभी सोनम मोबाइल पर चैट्स करती दिख रही है। आशंका है कि वो सुपारी किलर्स को लोकेशन शेयर कर रही थी। इसी दिन दोनों लापता हुए थे। 2 जून को राजा की बॉडी मिली।
ये… pic.twitter.com/o4hSnbndv0
— A F KHAN OFFICIAL (@kabirkhan488) June 9, 2025