Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

George Kurian Resignation : मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

George Kurian Resignation : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जॉर्ज कुरियन कोण आहेत, त्यांनी राजीनामा का दिला आणि राष्ट्रपतींनी तो तत्काळ का मंजूर केला, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 02:00 PM
मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

मोदी सरकारला धक्का! केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा, राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • मोदी सरकारला धक्का!
  • केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनी दिला राजीनामा
  • राष्ट्रपतींकडून तात्काळ मंजुरी
George Kurian Resignation News Marathi : केंद्रीय मंत्रिमंडळातून मोठी बातमी समोर येत असून केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मोदी सरकारमधून राजीनामा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी (23 जून 2026) राजीनामा सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार जॉर्ज कुरियन यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला. या राजीनाम्यामुळे आता मोदी सरकारमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी अल्पसंख्याक व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांचा सहा वर्षांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला होता. भाजपने त्यांना पुन्हा न निवडण्याचा निर्णय घेतला आहे. ६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे ऑगस्ट २०२४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री (MoS) म्हणून कार्यरत होते. ते भाजपचे एक प्रमुख नेते असून १९८० मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सदस्य आहेत.

तेल गेले, तूप गेले, हाती…! Mamta Banarjee ची स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी; बंडखोर गटाने थेट…

जॉर्ज कुरियन कोण आहेत?

जॉर्ज कुरियन हे केवळ भाजपचे ज्येष्ठ नेतेच नाहीत, तर त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले आहे. कुरियन यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार, केरळ विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली नाही.

जॉर्ज कुरियन यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, जॉर्ज कुरियन यांचा जन्म २० सप्टेंबर १९६० रोजी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एट्टुमानूर नगरपालिकेतील नंबियाकुलम येथे झाला. त्यांनी आपल्या मूळ गावी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर कायद्यातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली.

राज्यमंत्रीपासून ते रेल्वे राज्यमंत्री

९ जून २०२४ रोजी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ११ जून २०२४ रोजी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी, जॉर्ज कुरियन यांनी ओ. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी राजगोपाल यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणूनही काम केले होते.

Lucknow Fire News : लखनौमध्ये भीषण आग; 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, बचावासाठी नागरिकांची जीवघेणी धडपड

राजीनाम्याचे कारण काय होते?

  • राजीनामा देणारे मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत आला होता.
  • त्यांनी केरळ विधानसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.
  • सूत्रांनुसार, केंद्रीय नेतृत्व आता त्यांना राज्य राजकारणात आणण्याची तयारी करत आहे.

Web Title: Who is george kurian why did he resign from modi government minister post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • BJP
  • narendra modi

संबंधित बातम्या

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा
1

Maharashtra Political: वेळ आली तर दोन्ही जागा भाजप स्वबळावर लढणार; जयकुमार गोरेंचा इशारा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
2

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा,  सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी
3

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या; भाजप करणार घटक पक्षांशी चर्चा, सम्राट महाडिक यांच्यावर समन्वयाची जबाबदारी

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
4

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.