ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का (फोटो- सोशल मीडिया)
टीएमसीच्या बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांना अध्यक्षपदावरून हटवले आहे. तसेच अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदावरून हटविण्यात आले आहे. अरुप रॉय हे आटा टीएमसीचे नवे अध्यक्ष असणार आहेत. हृतब्रत बॅनर्जी यांच्या गटाने अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदावरून हटवले आहे.
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई तुरणमूळ कॉँग्रेसच्या एका विशेष अधिवेशनादरम्यान करण्यात आली आहे. यामध्ये टीएमसी चे अनेक नेते सहभागी झाले होते. या बैठकीत 30 सदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीच्या निकालाला थेट उच्च न्यायालयात आव्हान
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीतील पराभव स्वीकारणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी कठीण झाले आहे. आता त्यांनी भवानीपूर जागेच्या निवडणूक निकालांना आव्हान देणारी याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Ramdas Athawale : ‘उरलेल्यांनी रिपब्लिकन पक्षात यावे’; टीएमसीच्या खासदार-आमदारांना आठवलेंचे आवाहन
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा त्यांच्याच मतदारसंघात भवानीपूरमध्ये १५,१०५ मतांच्या फरकाने पराभव केला. टीएमसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकालांना आव्हान देणाऱ्या याचिकेची पडताळणी करण्यासाठी ममता बॅनर्जी उच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागात (रजिस्ट्री) गेल्या होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ४ मे रोजी झाली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रभावी विजयानंतर, सुवेंदू अधिकारी हे राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले. भवानीपूर विधानसभा जागा हा ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला मानला जात असे; त्यांनी यापूर्वी या मतदारसंघातून निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळे, भवानीपूरमधील पराभव हा टीएमसी आणि ममता बॅनर्जी या दोघांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.






