• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • 1 Lakh Fake Corona Test Report Made In Kumbhmela At Haridwar Nrsr

कुंभमेळ्यात तयार करण्यात आले १ लाख बनावट कोरोना चाचणी अहवाल, कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता

उत्तराखंड आरोग्य विभागाने (UTTarakhand Health Department) हरिद्धारमध्ये(haridwar) कुंभमेळ्यादरम्यान(Kumbhmela) करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल (Fake Corona Test Report) बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचे समोर आले आहे.

  • By साधना
Updated On: Jun 15, 2021 | 06:10 PM
कुंभमेळ्यात तयार करण्यात आले १ लाख बनावट कोरोना चाचणी अहवाल, कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुंभमेळ्याबाबत(Kumbhmela) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल (Fake Corona Test Report) बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचे समोर आले आहे. हे अहवाल खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

[read_also content=”पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम, गाढवांची सर्वाधिक संख्या असलेला जगातला तिसरा देश -दरवर्षी १ लाख गाढवांची भर https://www.navarashtra.com/latest-news/pakistan-is-standing-third-in-the-number-of-donkeys-world-wide-nrsr-142713.html”]

एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन ५० जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट ७०० चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

“पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील ‘घर क्रमांक ५’ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत,” अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “खोटे फोन नंबरही देण्यात आले आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि १८ इतर ठिकाणच्या लोकांनी एकच फोन क्रमांक दिला आहे”.

कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एजन्सीने दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने जमा करणं अपेक्षित होतं. त्याचीही चौकशी सुरु आहे”.

दरम्यान आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सविस्तर तपास अहवाल पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १५ दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु”.

हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात असून पुढील नोटीस येईपर्यंत सर्व एजन्सींचं देय थांबण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचं समोर आलं आहे जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते.

“नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणं गरजेचं आहे. एजन्सीकडे नोंदणी असणाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यातील ५० टक्के राजस्थानचे रहिवासी असून विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर आहेत,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

उच्च न्यायालयाने उत्तराखंडला कुंभदरम्यान दिवसाला ५० हजार चाचण्या करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना नमुने गोळा करण्याची जबाबदारी दिली होती.

हरिद्वारमध्ये १ ते ३० एप्रिलदरम्यान कुंभमेळा पार पडला. यावेळी नऊ एजन्सी आणि २२ खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या केल्या. यामध्ये अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या. याशिवाय राज्य सरकारच्या वतीनेही सरकारी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या.

एजन्सीकडून करण्यात आलेल्या एक लाख चाचण्या सध्या वादात आहेत. यापैकी फक्त १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के होता. याउलट एप्रिल महिन्यात हरिद्वारमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांवर पोहोचला होता.

पंजाबमधील एका व्यक्तीला जे कुंभमेळ्यात गेलेच नव्हते त्यांना हरिद्वार आरोग्य विभागाकडून मोबाईलवर कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. या व्यक्तीने आयसीएमआरकडे तक्रार केली. यानंतर त्यांनी राज्य प्रशासनाला याची माहिती दिली.

एनज्सीला प्रत्येक अँटिजन टेस्टसाठी ३५० रुपये आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यापेक्षा जास्त पैसे दिले जात होते. याचा अर्थ हा करोडोंचा घोटाळा आहे. इतर एनज्सींकडून करण्यात आलेल्या चाचण्यांच्या अहवालाचीही तपासणी केली जात आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

Web Title: 1 lakh fake corona test report made in kumbhmela at haridwar nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2021 | 05:49 PM

Topics:  

  • Kumbhmela

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“माझी बायको सुपरहिरो…” विकीचे कॅटवर नितांत प्रेम! गरोदर असताना अनेक समस्यांना दिले तोंड

“माझी बायको सुपरहिरो…” विकीचे कॅटवर नितांत प्रेम! गरोदर असताना अनेक समस्यांना दिले तोंड

Feb 24, 2026 | 06:51 PM
CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Feb 24, 2026 | 06:43 PM
PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 24, 2026 | 06:43 PM
Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Feb 24, 2026 | 06:35 PM
मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

Feb 24, 2026 | 06:27 PM
जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Feb 24, 2026 | 06:26 PM
Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Feb 24, 2026 | 06:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.