bjp minister pankaja munde meets dhananjay munde after resign marathi news
मुंबई– सत्ताधारी भाजपाच्या सहा नेत्यांच्या (BJP 6 leaders) साखर कारखान्यांना 500 कोटी रुपयांचं कर्ज ( Sugar factory 550 cr. loan)देण्याचा निर्णय राज्य सरकारनं ( CM Eknath Shinde government) घेतलाय. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं या कारखान्यांना कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर, आता राज्य सरकारनं या कारखान्यांना कर्ज देऊन मदतीची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 9 सारख कारखान्यांना 1023.57 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव सहकार विभागानं एप्रिलमध्ये मंत्रिमंडळांसमोर ठेवला होता. काही ठराविक कारखान्यांनाच मदत केली तर सराकरची बदनामी होईल असं सांगत शिंदे गट आणि भाजपातील काही मंत्री आणि अधिकाऱ्यांनी याला विरोध केला होता. तर आमच्याही कारखान्यांना मदत करा, अशी भूमिका घएत विरोधकांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं 9 साखर कारखान्यांना सरसकट
मदत देण्याऐवजी नव्यानं धोरण ठरवून त्यात येणाऱ्या कारखान्यांना मदत करण्यात येईल, असा निर्णय कॅबिनेमटमध्ये घेण्यात आला. त्यानुसार भाडेतत्वार चालवल्या जात नसलेल्या कारखान्यांना, एकूण मालमत्ता मूल्याच्या 70 टक्केच्या मर्यादेपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातही या कारखान्यांनी राज्य बँक, जिल्हा आणि इतर बँकांकडून घेतलेलं कर्ज वजा करुन शिल्लक रक्कमेचं कर्ज देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. नुकत्याच झालेल्या बैठकीत 9 पैकी 6 कारखान्यांना 549 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलंय. या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली नाही तर ती जबाबदारी सरकारची असणार आहे.
या कर्जाच्या यादीतून पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखाने वगळण्यात आल्याची माहिती आहे. बीड जिल्ह्यातील वैजनाथ सहकारी साखर कारखाना, नगर जिल्ह्यातील गणेश सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना यांना या यादीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. आता यावरुन नाराजीत भर पडण्याची शक्यता आहे.
6 साखर कारखान्यांना कर्ज देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
1. शेतकरी सहकारी साखर कारखाना, औसा, लातूर
2. शंकर सहकारी साखर कारखाना, माळशिरस, सोलापूर
3. रामेश्वर सहकारी साखर कारखाना, भोकरदन, जालना
4. कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना, इंदापूर पुणे
5. निरा-भीमा सहकारी साखर कारखाना, इंदापूर, पुणे
6. भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ, सोलापूर