Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केकचं बिल देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला आणि बॅंकेतून गेले 1.6 लाख रुपये

पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपशील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 03, 2022 | 04:05 PM
केकचं बिल देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला आणि बॅंकेतून गेले 1.6 लाख रुपये
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पैशासंबधी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी न घेणं अंगलट येऊ शकतं. याचं एक उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. पुण्यात एका महिलेने ऑनलाईन केक ऑर्डर केल्यानंतर पैसे देताना क्यूआर कोड स्कॅन केला अन् 1.6 लाख रुपये गमावल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तपास सुरू असताना खासगी बँकेत हे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोशी येथून 400 रुपयांचा केक एका 30 वर्षीय महिलेने ऑनलाइन मागविला. फसवणूक करणाऱ्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले आणि त्यानंतर या महिलेचे तब्बल 1.67 लाख रुपये डेबिट झाले. याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार (Complaint in cyber cell) दाखल केली होती. प्राथमिक तपासानंतर सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी बँकेत हे पैसे ट्रान्सफर झाल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना लक्षात आले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे.

 

 QR कोड केला स्कॅन

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगितले, की संबंधित महिलेला केक पाठवायचा असल्याने ती परिसरातील केक शॉपचे नंबर्स शोधत होती. त्यात तिने एक दुकान निवडले आणि 4 मार्च रोजी 400 रुपये किंमतीचा केक ऑर्डर केला. त्यानंतर तिने ऑनलाइन पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला, पण हो होऊ शकला नाही. समोरील व्यक्तीने तिला एक QR कोड सेंड केला आणि तो स्कॅन करून पेमेंट करण्याची विनंती केली. तिने QR कोड स्कॅन केला तेव्हा 400 रुपयांचा व्यवहार झाला.

या पहिल्या व्यवहारानंतर लगेचच तिच्या बँक खात्यातून इतर अनेक व्यवहार झाले. काही तासांतच सायबरक्रूकने तिचे बँक खाते 1.67 लाख रुपये ट्रान्सफर करून रिकामे केले, असे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले, की आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे, की पैसे दुसऱ्या राज्यातील खासगी बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. आम्ही बँकेकडून अधिक तपशील मागितले आहेत. आमची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहेत.

Web Title: A women scanned the qr code to pay the bill and 1 6 lakh rupees debited from account nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • cyber crime
  • Pimpri Chinchwad crime
  • pune crime news

संबंधित बातम्या

Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
1

Pune Crime News: पाकिस्तानी, ओमानचे नंबरशी? पुण्यात अटक केलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक
2

Crime News: परदेशी नागरिकांना कर्जाचे आमिष दिले अन्…; सायबर पोलिसांकडून 4 जणांना अटक

सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…
3

सायबर चोरट्यांनी आता लढवली ‘ही’ नवी शक्कल; APK फाईल पाठवतात अन् एक क्लिक करताच…

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक
4

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.